पुणे : ‘भारतीय जनता पक्षाचा सर्वोच्च न्यायालयाच्या माध्यमातून आरक्षण संपविण्याचा डाव आहे. त्यांना आरक्षण द्यायचे नाही,’ असा घणाघाती आरोप वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला. ‘केवळ मोर्चे, आंदोलन करून चालणार नाही, तर आमदार झाल्याशिवाय विधानसभेत आरक्षणाच्या मुद्द्यावर आवाज उठवता येणार नाही. त्यासाठी वंचितला मतदान करा,’ असे आवाहन त्यांनी केले.

वंचित बहुजन आघाडीच्या पुणे शहर, जिल्ह्यातील विविध विधानसभा मतदारसंघांतील उमेदवारांच्या प्रचारार्थ नाना पेठ येथे झालेल्या सभेत प्रकाश आंबेडकर यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला. त्या वेळी ते बोलत होते. ‘केंद्रात आणि राज्यात सत्ताधारी असलेल्या भाजपला आरक्षण संपवायचे आहे. इतर मागासवर्गाचे आरक्षण थांबविण्यात आले होते. अनुसूचित जाती (एससी) आणि अनुसूचित जमाती (एसटी) वर्गाचे आरक्षणदेखील थांबविण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयाने क्रिमिलेअरची व्याख्या केली आहे. एखाद्या कुटुंबातील व्यक्तीने आरक्षणाचा लाभ घेतला असल्यास त्यांना आरक्षणाचा लाभ मिळणार नाही, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे मोठ्या कष्टाने राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले आरक्षण न्यायालयाच्या माध्यमातून संपविण्याचा भाजपचा डाव आहे,’ असा आरोप आंबेडकर यांनी केला.

principal suspended for negligence in duty in midday meal food poisoning case pmd
वर्धा : कर्तव्यात कसुर; मुख्याध्यापक निलंबित; शालेय पोषण आहार विषबाधा प्रकरण
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
justice shekhar yadav controversial statement
अन्वयार्थ : ‘सांविधानिक भावना दुखावण्या’पल्याड…
loksatta editorial on india s relations with Sheikh Hasina
अग्रलेख : वंग(मैत्री)भंगाचे वास्तव…
Jyotiraditya Scindia lady killer said Kalyan Banerjee
“सिंधिया लेडी किलर”, तृणमूलचे खासदार असं का म्हणाले? केंद्रीय मंत्र्याचंही जशास तसं प्रत्युत्तर
What is dispute over historic Durgadi Fort and what did court say while handing over fort to government
ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्याचा वाद काय आहे? त्यावर मुस्लिमांचा दावा कसा? किल्ला सरकारच्या ताब्यात देताना न्यायालयाने काय म्हटले?
Religion shouldnt justify reservation
इथे मुद्दा मुस्लिमांच्या लांगूलचालनाचा नसून, आरक्षणाच्या निकषांचा आहे…
Manoj Jarange On Santosh Deshmukh Case
Santosh Deshmukh Case : “आरोपींना मोकाट फिरू देणार असाल तर…”, मनोज जरांगेंची सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावर संतप्त प्रतिक्रिया

हेही वाचा – विकासासाठी महायुतीची गरज, नितीन गडकरी यांचे आवाहन

‘नोकरीमध्ये असलेल्या आरक्षणामुळे पदोन्नतीचा प्रश्न मोठा आहे. याबाबत भांडले पाहिजे. आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय उलथवून द्यावा लागेल. त्यासाठी विधानसभेत पक्षाचे आमदार असणे आवश्यक आहे. आता मोर्चे, आंदोलन काढून चालणार नाही. भाजपला आरक्षण नको आहे. आरक्षण टिकविण्यासाठी जनतेने या वेळी मतदान करावे,’ असे आंबेडकर म्हणाले.

हेही वाचा – महाविकास आघाडीतील दोन्ही पक्षांना घेऊन काँग्रेस बुडणार, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची टीका

‘मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत उलटसुलट लिहिले जात आहे. त्याबाबत आंदोलने झाली. त्यामुळे मुस्लिम समाजाने मोहम्मद पैगंबर यांच्यासाठी ‘वंचित’च्या उमेदवारांना मते द्यावीत,’ असे आवाहन त्यांनी केले.

Story img Loader