पुणे : रंगपंढरी, पुणे या संस्थेच्या कलाकारांनी सादर केलेली ‘विषाद’ एकांकिका सांघिक विजेतेपदासह विनोदमूर्ती प्रकाश इनामदार करंडकाची मानकरी ठरली. विजय पटवर्धन फाऊंडेशन आयोजित या स्पर्धेत कलादर्शन संस्थेच्या ‘यशोदा’ आणि मुक्ताई फाऊंडेशनच्या ‘उरूस’ एकांकिकेने अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळविले. पहिलेच वर्ष असलेल्या या स्पर्धेत २४ संघांनी सहभाग घेतला होता. अभिनेते-दिग्दर्शक प्रवीण तरडे, ज्येष्ठ अभिनेत्री जयमाला इनामदार, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पुणे शाखेचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत स्पर्धेचे पारितोषिक वितरण करण्यात आले. विनीता पिंपळखरे, सौरभ पारखी, नितीश पाटणकर, फाउंडेशनच्या अध्यक्षा वृषाली पटवर्धन, विजय पटवर्धन, आदित्य मोडक, प्रवीण वानखेडे, श्रेयस दीक्षित, सचिन नगरकर यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.
स्पर्धेचा सविस्तर निकाल – वैयक्तिक पारितोषिके
दिग्दर्शन – ज्ञानेश विधाते (रंगपंढरी)
अभिनय – अनिल आव्हाड (जिराफ थिएटर, टिटवाळा), सायली रौंदळे (रंगपंढरी)
लेखन- ज्ञानेश विधाते (रंगपंढरी)
पार्श्वसंगीत- राजेश देशपांडे (सृजन द क्रिएशन, मुंबई)
विशेष लक्षवेधी विनोदी कलाकार- वनमाला वैदे (सृजन द क्रिएशन, मुंबई)
हेही वाचा : दस्तावेजीकरणाअभावी चित्रांमागच्या कथा विस्मरणात – सुहास बहुळकर यांची खंत
नाट्यक्षेत्रामध्ये प्रामाणिक कष्ट, प्रयत्नाला नेहमीच यश मिळते. करिअर म्हणून या क्षेत्राकडे पाहायला हरकत नाही. नाट्यक्षेत्रातून सदैव आनंदच मिळतो. – प्रवीण तरडे, अभिनेते-दिग्दर्शक