पुणे : रंगपंढरी, पुणे या संस्थेच्या कलाकारांनी सादर केलेली ‘विषाद’ एकांकिका सांघिक विजेतेपदासह विनोदमूर्ती प्रकाश इनामदार करंडकाची मानकरी ठरली. विजय पटवर्धन फाऊंडेशन आयोजित या स्पर्धेत कलादर्शन संस्थेच्या ‘यशोदा’ आणि मुक्ताई फाऊंडेशनच्या ‘उरूस’ एकांकिकेने अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळविले. पहिलेच वर्ष असलेल्या या स्पर्धेत २४ संघांनी सहभाग घेतला होता. अभिनेते-दिग्दर्शक प्रवीण तरडे, ज्येष्ठ अभिनेत्री जयमाला इनामदार, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पुणे शाखेचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत स्पर्धेचे पारितोषिक वितरण करण्यात आले. विनीता पिंपळखरे, सौरभ पारखी, नितीश पाटणकर, फाउंडेशनच्या अध्यक्षा वृषाली पटवर्धन, विजय पटवर्धन, आदित्य मोडक, प्रवीण वानखेडे, श्रेयस दीक्षित, सचिन नगरकर यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा