पुणे : बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी शिवलिंगाचे दर्शन घेतले. मात्र, पवार कुटुंबीयांसोबत वळसे कुटुंबीय नसल्याने या दोन कुटुंबातील दरी स्पष्टपणे जाणवत होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भीमाशंकरला आल्यानंतर दिलीप वळसे पाटील किंवा त्यांच्या पत्नी किरण वळसे पाटील या नेहमी त्यांच्यासोबत भीमाशंकर येथे दर्शनासाठी येत असत. राष्ट्रवादीशी फारकत घेत दिलीप वळसे पाटील शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले. त्यामुळे यंदाच्या वर्षी दर्शनासाठी किरण वळसे पाटील यांची अनुपस्थिती जाणवली. प्रतिभा पवार या दर्शनाला आल्यानंतर प्रथमच वळसे कुटुंब त्यांच्यासोबत दर्शनाला नव्हते. दरवर्षी दर्शन झाल्यानंतर जेवणाचा बेतही वळसे पाटील यांच्याकडेच असायचा.

हेही वाचा – “मित्रांनो ठीक आहे, मागे मीच मोदींविरोधात सभा घेतल्या, कारण…”; बारामतीतील भाषणात अजित पवारांचं वक्तव्य

हेही वाचा – पुणे : महागडे २६६ मोबाइल संच चोरणारा झारखंडमधून अटकेत

दिलीप वळसे पाटील यांचे खंदे समर्थक देवेंद्र शहा यांनी प्रतिभा पवार आणि सुप्रिया सुळे यांचे स्वागत केले. मात्र, पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांना याबाबत माहिती नव्हती.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pratibha pawar supriya sule took darshan of bhima shankar shivling absence of valse patil family pune print news vvk 10 ssb