पुणे : देशातील ९० टक्के लहान मुले आठवड्यातून चार ते पाचपेक्षा जास्त वेळा दूध पितात. याचवेळी ४० टक्के पालक फ्लेवर्ड दूध हे मुलांना शाळेचा डबा म्हणून देतात. तसेच, मुलांना कॅल्शियमचा योग्य पुरवठा व्हावा म्हणून देशभरातील ६० टक्के पालक दूध देण्यास पसंती देतात. पुण्यात हे प्रमाण ६२ टक्के असल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बालदिनाच्या निमित्ताने भारतीय पालक त्यांच्या मुलाला दूध का देतात, हे समजून घेण्यासाठी गोदरेज जर्सी कंपनीने एक सर्वेक्षण केले. दिल्ली, लखनौ, मुंबई, पुणे, हैदराबाद, चेन्नई, बंगळुरू आणि कोलकता येथील ग्राहकांनी या सर्वेक्षणात सहभाग घेतला. ‘बॉटम्स अप…इंडिया सेज चीअर्स टू मिल्क!’ या सर्वेक्षणात ग्राहकांच्या पसंतीबरोबरच उद्योगातील कल जाणून घेण्यात आला. आपल्या पाल्याला दूध देण्यामागील पालकांची कारणे समजून घेण्यासोबत मुलांसाठी ते दुधाशी संबंधित कोणती उत्पादने स्वीकारतात, हेही जाणून घेण्यात आले.

हेही वाचा – पुणे : भाजपने पैसे वाटप केल्याचा आरोप, बिबवेवाडी पोलीस ठाण्यात ‘राष्ट्रवादी’चा ठिय्या

या सर्वेक्षणानुसार, भारतीय पालकांना मुलांना दूध प्यायला देण्याचे महत्त्व माहिती आहे. याचवेळी अनेक पालक हे मुले तंदुरुस्त राहण्यासाठी आणि वजन व्यवस्थापनासाठी दुधाला प्राधान्य देत आहेत. मुलांना ऊर्जेसाठी जेवणाऐवजी दूध देण्याकडेही पालकांचा कल आहे. दुधातील पोषणमूल्याचाही पालक विचार करतात. त्यामुळे मुलांना कॅल्शियमचा पुरेसा पुरवठा व्हावा म्हणून देशातील ६० टक्के पालक दूध देतात. पुण्यात हे प्रमाण ६२ टक्के आहे. फ्लेवर्ड दूध हे शाळेचा डबा म्हणून किंवा दिवसभरात पिण्यासाठी किंवा विशेषतः खेळाच्या वेळी प्यायला देणाऱ्या पालकांचे प्रमाण ४० टक्के आहे.

हेही वाचा – पुण्यातील वडगावशेरीमधील शरद पवार गटाचे नेते चंद्रकांत टिंगरे यांच्यावर अज्ञाताकडून हल्ला

दुधाचे पोषणमूल्य हे मुलांसाठी अत्यंत चांगले असल्याचे जागतिक स्तरावरील तसेच भारतातही अनेक संशोधनांनी सिद्ध केले आहे. मुलांच्या वाढत्या वयासाठी उच्च पौष्टिक गुणवत्तेची प्रथिने, कॅल्शियम, फॉस्फरस आणि व्हिटॅमिन ए अत्यंत आवश्यक असते. – भूपेंद्र सुरी, मुख्य कार्यकारी अधिकारी, गोदरेज जर्सी

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Preference of pune parents to give milk to their children find out the top reasons revealed in the survey pune print news stj 05 ssb