पुणे : पुण्याच्या निघोजेमध्ये अज्ञात वाहनाने गर्भवती महिलेला पाठीमागून जोरात धडक देऊन जखमी केले आहे. श्रद्धा सागर येळवंडे अस जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. श्रद्धा येळवंडे या गर्भवती असून त्यांचं बाळ सुखरूप असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. अज्ञात वाहन चालकाचा पिंपरी- चिंचवडचे महाळुंगे पोलीस शोध घेत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सायंकाळी पाचच्या सुमारास देहू- निघोजे रस्त्यावर बालिंगवस्ती या ठिकाणी जखमी श्रद्धा येळवंडे या रस्त्याच्या कडेने डाव्या बाजूने चालत जात होत्या. त्यावेळी भरधाव वेगातील स्विफ्ट गाडी नंबर (एम.एच १४ एच. के.०५२९ ) ने पाठीमागून जोरात धडक दिली. यात श्रद्धा येळवंडे जखमी झाल्या असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आल आहे.
दरम्यान, धडक दिल्यानंतर स्विफ्ट कार चालक न थांबताच त्या ठिकाणाहून फरार झाला आहे. याप्रकरणी म्हाळुंगे पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनचालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाहन चालकाचा महाळुंगे पोलीस शोध घेत आहेत.
© The Indian Express (P) Ltd