पुणे : ‘घोटभर पाणी’ या एकांकिकेने लोकप्रिय झालेले प्रेमानंद गज्वी यांना भाषणाच्या ओघात दम लागल्यासारखे झाले आणि ‘मला जरा पाणी द्या’, अशी विनंतीच त्यांनी कार्यकर्त्यांना केली.

पिंपरी-चिंचवड येथे होत असलेल्या शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाच्या उदघाटन कार्यक्रमात मावळते अध्यक्ष या नात्याने गज्वी बोलत होते. नाट्य परिषदेकडे विविध पुरस्कार सुरू करण्याची मागणी करून गज्वी यांनी भाषण सुरू ठेवले. कालावधी वाढत असताना गजवी यांना दम लागला आणि ‘मला जरा पाणी द्या’, असे भाषणाच्या प्रवाहात कार्यकर्त्यांना सांगितले. घोटभर पाणी पिऊन त्यांनी अगदी थोडक्या शब्दांत मनोगताची सांगता केली.

Story img Loader