लोकसत्ता प्रतिनिधी

पिंपरी: शैक्षणिक संस्थांजवळ तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीला आळा घालण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिका आणि पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाने कडक पावले उचलण्यास सुरूवात केली आहे. शाळेच्या शंभर मीटर आवारात असलेल्या ७२ टपऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला.

Municipal corporation issues notice to 28 constructions violating air pollution control regulations
वायू प्रदूषण नियंत्रण नियमावलीचे उल्लंघन करणाऱ्या २८ बांधकामांना पालिकेची नोटीस
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Eleven policemen on duty at the Welfare Court suspended kalyan news
कल्याण न्यायालयातील कर्तव्यावरील अकरा पोलीस निलंबित
sexual assault at anna university
Chennai Crime: चेन्नईत रस्त्यावरील ठेलेवाल्याचा कॉलेज कॅम्पसमध्येच विद्यार्थिनीवर बलात्कार; सत्ताधाऱ्यांशी संबंध असल्याचा विरोधकांचा आरोप!
Evidence that Vishal Gawli of Kalyan is mentally ill kalyan news
कल्याणच्या विशाल गवळीकडे मनोरुग्ण असल्याचे दाखले;  याच आधारावर यापूर्वी जामीन मिळविल्याची माहिती
teacher lost 20 lakh rupees share market
शिक्षकाला वीस लाखांचा गंडा, सुरतचे तीन आरोपी गजाआड; बुलढाणा सायबरची कारवाई
software exports maharashtra
‘आयटी’त पुण्याचा झेंडा! सॉफ्टवेअर निर्यातीत मुंबई, नागपूरपेक्षा अव्वल कामगिरी
mcoca action against Chuha Gang, Pune, Chuha Gang,
पुणे : दहशत माजविणार्‍या ‘चूहा गँग’वर मोक्का कारवाई, आंबेगाव पोलिसांची कारवाई

शहरातील विविध भागातील शैक्षणिक संस्थांच्या शंभर मीटर परिसराची पाहणी महापालिका आणि पोलीस दलाच्या संयुक्त पथकाने केली. टपरी, चहाविक्रीची ठिकाणे, पत्राशेड, खासगी जागा, बंदिस्त गाळे, भाजी विक्री केंद्र आदींची तपासणी करण्यात आली. संशयास्पद वाटलेल्या विक्रेत्यांना नोटीस बजावून तंबाखूजन्य पदार्थ विक्री करण्यात येऊ नये अन्यथा कडक कारवाईचा इशारा दिला. ‘ब’ क्षेत्रीय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील चार आणि ‘ई’ क्षेत्रीय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील आठ विक्रेत्यांना नोटिसा बजाविल्या.

आणखी वाचा-पिंपरी-चिंचवड शहर ‘खड्ड्यांत’

पोलीस पथक आणि महापालिकेच्या पथकाने शहरातील विविध भागातील शैक्षणिक संस्थांच्या परिसराची संयुक्त पाहणी केली. तंबाखूजन्य पदार्थ विक्री होणारी ७२ ठिकाणे यात आढळून आली. सिगारेट आणि इतर तंबाखूजन्य पदार्थ नियंत्रण कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. या कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल ३२५ गुन्हे दाखल केले आहेत. -विनयकुमार चौबे, पोलीस आयुक्त

नागरिकांनी या मोहिमेत सहभाग घेऊन शाळांच्या परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री होत असल्यास महापालिकेच्या शिक्षण विभागास तसेच संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ याबाबतची माहिती द्यावी. नागरी सहभागामुळे भविष्यातील पिढ्यांसाठी आरोग्यदायी आणि सुरक्षित वातावरण निर्माण करण्यास निश्चितपणे हातभार लागेल. -प्रदीप जांभळे-पाटील, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी-चिंचवड महापालिका

Story img Loader