करोनाच्या दोन वर्षांनंतर दिमाखदारपणे साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवातील देखाव्यांची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. करोना काळात संयमाचे विराट दर्शन घडविणाऱ्या गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये अमाप उत्साहाचे दर्शन घडत आहे. यंदाच्या उत्सवात मंडळांनी नावीन्यपूर्ण विषयांवरील देखाव्यांवर भर दिला असून मंडप उभारणीसह देखाव्यांची तयारीही आता शेवटच्या टप्प्यामध्ये आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

गणेशोत्सवाला अवघे पाच दिवस उरल्याने गणेश मंडळांची तयारी जोशात सुरू आहे. मंडळांच्या कार्यकर्त्यांची तयारीची लगबग सुरू आहे. पौराणिक, ऐतिहासिक, प्रबोधनपर, सांस्कृतिक, विज्ञानपर आणि काल्पनिक देखावे यंदा साकारण्यात येत असून उत्सवातील देखाव्यांची परंपरा गणेशभक्तांना दीर्घ प्रतीक्षेनंतर पाहायला मिळणार आहे. देशभरातील पुरातन मंदिरे आणि प्रेक्षणीय स्थळांच्या प्रतिकृती साकारण्यात येत आहेत.

हेही वाचा : पुण्यातील वाहतूककोंडीत अडकला मुख्यमंत्र्यांचा ताफा; CM शिंदे रस्त्याच्या कडेला जाऊन उभे राहिले असता पुणेकरांनी केली तक्रार अन् त्यानंतर…

काही मंडळे प्रबोधनपर जिंवत देखावे साकारत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्यगाथेपासून ते पालखी सोहळ्यापर्यंत, करोना संकट ते देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षापर्यंत असे वैविध्यपूर्ण विषय जिवंत देखाव्यामध्ये साकारण्यात येत आहेत. साईनाथ मंडळ ट्रस्टकडून आझाद हिंद सेनेवर आधारित जिवंत देखावा साकारण्यात येत आहे. हुतात्मा बाबू गेनू मंडळ ट्रस्टच्या वतीने यंदा शिर्डीतील साईबाबा मंदिराची प्रतिकृती साकारण्यात येणार आहे.