पुणे : महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या नियोजनानुसार मराठा समाज, खुल्या प्रवर्गातील नागरिकांचे सर्वेक्षण मंगळवारपासून (२३ जानेवारी) सुरू करण्यात येणार आहे. त्याची जय्यत तयारी पुणे, पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण भागात करण्यात आली आहे. सर्वेक्षण करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच गोखले इन्स्टिट्यूटकडील मास्टर ट्रेनरकडून तालुका ट्रेनर आणि जिल्हास्तरावरील नोडल अधिकाऱ्यांना शनिवारी प्रशिक्षण देण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जिल्हास्तरीय ट्रेनिंग जिल्हाधिकारी कार्यालय, तर महानगरपालिकास्तरीय ट्रेनिंग महानगरपालिकेत देण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या ट्रेनिंगमध्ये मास्टर ट्रेनर अश्विनी सोनटक्के यांनी मार्गदर्शन केले. प्रत्येक तालुक्यातुन ३०० एन्युमरेटर्समागे एक ट्रेनर, ३०० ते ६०० साठी दोन ट्रेनर, तर ६०० पेक्षा जास्त एन्युमरेटर्ससाठी तीन ट्रेनर नियुक्त करण्यात आले आहेत. जिल्हास्तरावर ट्रेनिंग घेतलेले तालुकास्तरीय ट्रेनर तालुक्यासाठी नियुक्त सुपरवायजर आणि एन्युमरेटर्स शनिवार आणि रविवारी (२१ आणि २२ जानेवारी) तालुक्याच्या ठिकाणी ट्रेनिंग देणार आहेत.

हेही वाचा : “उपोषणामुळे मला शरीर साथ देत नाही, पण…”, मराठा आरक्षणावरून जरांगे-पाटील भावुक

गोखले इन्स्टिट्यूटकडील मास्टर ट्रेनर तालुकास्तरीय ट्रेनिंगला मदत करतील, तसेच सर्वेक्षणाचे काम पूर्ण होईपर्यत जिल्हा मुख्यालयात उपस्थित राहणार आहेत. सर्वेक्षणाचे काम २३ ते ३१ जानेवारी या कालावधीत पूर्ण करण्यात येणार आहे. या सर्वेक्षणासाठी तालुकास्तरावर १५ नोडल, १५ असिस्टंट नोडल ऑफिसर, ४६६ सुपरवायजर आणि ६५९६ एन्युमरेटर्सची नियुक्ती करण्यात आली, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Preparations for survey of maratha community pune print news psg 17 pbs