पुणे : मताधिक्य वाढविण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला आणि बारामती लोकसभा मतदारसंघातील शहरी भाग असलेल्या खडकवासला विधानसभा मतदारसंघात महायुतीकडून मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. एक ते सात मे हा कालावधी केवळ बारामतीसाठी राखीव ठेवावा, अशी सूचना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महायुतीच्या कार्यकर्त्यांना केली आहे.

खडकवासला विधानसभा मतदारसंघातील मोठ्या गृहसंकुलांची माहिती महायुतीकडून संकलित करण्यात आली असून येथील समस्या सोडविल्या जातील, असा ‘शब्द’ नागरिकांना द्या, असेही पवार यांनी सुचविल्यामुळे बारामतीसाठी खडकवासल्यात मोर्चेबांधणी करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.

Uddhav Thackeray on PM Narendra Modi
“आधी मणिपूर ‘सेफ’ करा आणि मग…”; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं मोदी सरकारवर टीकास्र!
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Baramati protests that Pratibha Pawar was prevented from campaigning Inspection of Sharad Pawar bag Pune news
प्रतिभा पवार यांंना प्रचारापासून रोखल्याचे बारामतीत पडसाद; शरद पवार यांच्या बॅगची तपासणी
Yogi Adityanath who made the statement Batenge to Katenge now has a different slogan Pune news
‘बटेंगे तो कटेंगे’ असे वक्तव्य करणारे याेगी आदित्यनाथ यांचा आता ‘हा’ नारा
CM Siddaramaiah, CM Siddaramaiah Solapur,
मोदींची सत्ता गेल्यावरच देशात ‘अच्छे दिन’ – सिद्धरामय्या
Maharashtra, Delhi Politics, Small State,
लिलीपुटीकरण…
bjp slogans batenge to katenge ek hai to safe hai in maharashtra assembly elections
अग्रलेख : घोषणांच्या म्हशी…

हेही वाचा – पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जाहीर सभेबरोबरच ‘रोड शो’

बारामती लोकसभा मतदारसंघासाठी ७ मे रोजी मतदान होणार आहे. बारामती लोकसभा मतदारसंघाअंतर्गत येत असलेल्या बारामती, दौंड, इंदापूर, पुरंदर, भोर याबरोबरच खडकवासला विधानसभा मतदारसंघ येतो. खडकवासला विधानसभा मतदारसंघातील बहुतांश भाग शहरी असून शहरी भागातून भाजपला गेल्या दोन लोकसभा निवडणुकीत मतदान झाले आहे. त्यामुळे यावेळी महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांना येथून किमान एक लाखांचे मताधिक्य मिळविण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यादृष्टीने खडकवासल्यात मोर्चेबांधणी सुरू झाली आहे.

महायुतीचे खडकवासल्यातील निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन रविवारी झाले. त्यावेळी अजित पवार यांनी महायुतीच्या कार्यकर्त्यांना त्याबाबतची स्पष्ट सूचना केली. बारामती लोकसभा मतदारसंघात येत असलेल्या खडकवासला परिसरात १२६४ च्या आसपास गृहसंकुले आहेत. यातील काही सोसायट्यांमध्ये पाच-पाच हजार सदनिका आहेत. त्यादृष्टीने महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचाराचे नियोजन आणि आखणी करावी. रस्ते, वाहतूक कोंडी, पाणी प्रश्न अशा सुटणाऱ्या समस्या या भागात आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत चर्चा करून या समस्या तातडीने मार्गी लावल्या जातील. त्यामुळे प्रचाराला जाताना महायुतीच्या कार्यकर्त्यांनी तसा ‘शब्द’ नागरिकांना द्यावा, असे पवार यांनी यावेळी सांगितले. घड्याळ या चिन्हाला मतदान म्हणजे महायुतीला मतदान हे मतदारांपर्यंत पोहोचवून सोसायट्यांतील मतदारांना मतदान केंद्रांपर्यंत आणण्याची जबाबदारी कार्यकर्त्यांनी घ्यावी, असे पवार यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा – पुणे : बोहरी आळीत आग; रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी हलविले

महायुतीचे जिल्ह्यात चार उमेदवार आहेत. मात्र पहिली निवडणूक बारामतीसाठी होणार आहे. त्यामुळे प्रचारातही खडकवासल्यातील महायुतीच्या कार्यकर्त्यांनी बारामती लोकसभा निवडणुकीलाच प्राधान्य द्यावे. प्रचाराचे सातत्य टिकविण्यासाठी एक ते सात मे हा कालावधी केवळ बारामतीसाठी राखीव ठेवावा. त्यानंतर पुणे, शिरूर आणि मावळ लोकसभा मतदारसंघाच्या प्रचाराचे नियोजन करावे, अशी सूचना पवार यांनी केली.