पुणे : जागतिक मराठी अकादमी आणि डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठातर्फे पिंपरी येथे पुढील वर्षी ६ ते ८ जानेवारी या कालावधीत ‘शोध मराठी मनाचा’ जागतिक मराठी संमेलन आयोजित करण्यात आले आहे. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य आणि लेखक डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांची संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. तर, विद्यापीठाचे कुलपती डॅा. पी. डी. पाटील या संमेलनाचे स्वागताध्यक्ष आहेत, अशी माहिती जागतिक मराठी अकादमीचे अध्यक्ष रामदास फुटाणे यांनी दिली.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
या संमेलनात जगभरातून विविध देशांमधील मराठी बांधव सहभागी होणार असून मराठी भाषा, संस्कृती, साहित्य, कला, उद्योग, व्यवसाय अशा अनेक क्षेत्रांचा जागतिक पातळीवरील पट त्या त्या क्षेत्रातील तज्ज्ञ उलगडवून दाखवणार आहेत.
First published on: 22-08-2022 at 16:03 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: President shodh marathi manacha meeting dr dnyaneshwar mule pune print news ysh