पुणे : राज्य शासनाकडून दबाव टाकण्यात आल्याने राज्य मंडळाला दहावी बारावीच्या परीक्षांसाठी दहा मिनिटे वाढवून द्यावी लागली आहेत. मात्र या निर्णयामुळे राज्य मंडळाच्या स्वायत्ततेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

राज्य मंडळातर्फे बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते २१ मार्च या कालावधीत, तर दहावीची परीक्षा २ ते २५ मार्च या कालावधीत होत आहे. या परीक्षांदरम्यान गैरप्रकार होऊ नयेत या दृष्टीने राज्य मंडळाने काही उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला. त्या अनुषंगाने राज्याचे मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत परीक्षेच्या निर्धारित वेळेपूर्वी दहा मिनिटे प्रश्नपत्रिकांचे वितरण करण्याची सुविधा स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार मंडळाकडून संबंधित निर्णय जाहीर करण्यात आला. मात्र या निर्णयानंतर नाराजीचा सूर व्यक्त होऊ लागला.

impeachment motion against justice Shekhar Yadav
अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींविरोधात महाभियोगाची शक्यता; महाभियोग म्हणजे काय? आजवर किती न्यायाधीशांवर झाली कारवाई?
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
markadwadi villagers marathi news
मारकडवाडी ग्रामस्थांच्या शंकांचे निरसन करणे आवश्यक, रामदास आठवले यांची भूमिका
Rock dove bird pune, Rock dove, Municipal Corporation pune, pune,
पुणे : पारव्यांना खाद्य टाकताय सावधान…! महापालिका वसूल करणार ‘एवढा’ दंड
Opposition boycotts MLAs oath taking ceremony in Assembly session Voting through EVMs alleged to have been rigged Print politics news
आमदारांच्या शपथविधीवर विरोधकांचा बहिष्कार
ministerial post, west varhad, vidarbha
पश्चिम वऱ्हाडात मंत्रिपदाची कुणाला ‘लॉटरी’?
bahujan vikas aghadi future in vasai virar after defeat all three candidates along with hitendra thakur
वसई-विरारमध्ये हितेंद्र ठाकूर यांच्या बविआचे भवितव्य काय?
maharashtra cabinet expansion before nagpur session
मंत्रिमंडळ विस्तार नागपूर अधिवेशनापूर्वी; मुख्यमंत्री फडणवीस यांचे संकेत, ११ किंवा १२ तारखेला शक्यता

हेही वाचा – “महाविकास आघाडीने स्वतःचे घर सांभाळावे, उगीच आमच्या डोक्यावर खापर फोडू नये”, ‘त्या’ आरोपावर देवेंद्र फडणवीसांचा अजित पवारांना टोला

हेही वाचा – संपत्तीत महिलांना समान वाटा, पुणे जिल्ह्यात महिलांच्या नावे आठ लाख १५ हजार मिळकती

परीक्षेच्या निर्धारित वेळेपूर्वी प्रश्नपत्रिकांचे वितरण करण्याचा निर्णय विनोद तावडे शिक्षणमंत्री असतानाच्या काळात घेण्यात आला होता. तर परीक्षेच्या निर्धारित वेळेपूर्वी दहा मिनिटे प्रश्नपत्रिकांचे वितरण करण्याची सुविधा स्थगित करण्याचा निर्णयही आता भाजपा सत्तेत असतानाच्याच काळात झाला. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांकडून राज्य शासनाकडे दाद मागण्यात आल्याने शासनाकडून वेळ वाढवून देण्याची ‘सूचना’ राज्य मंडळाला करण्यात आली. त्यामुळे राज्य मंडळाला दहा मिनिटे वाढवून देण्याचा निर्णय घ्यावा लागला. स्वायत्त संस्था असलेल्या राज्य मंडळाच्या स्वायत्ततेवर घाला घालण्यात आल्याचे यापूर्वी अनेकदा दिसून आले आहे. आता दहा मिनिटे वाढवून देण्याच्या निर्णयामुळे पुन्हा एकदा राज्य मंडळाच्या स्वायत्ततेचा मुद्दा अधोरेखित झाला आहे.

Story img Loader