दुष्काळी परिस्थितीत दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने म्हशीच्या दुधासाठीच्या खरेदी दरात प्रति लिटर एक रूपया अठ्ठावीस पैशांची वाढ केली आहे. संघाचे अध्यक्ष बाळासाहेब खिलारी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे.
सध्या राज्य शासनातर्फे म्हशीच्या दुधाला (६.० फॅट व ९.० एसएनएफ) २५ रूपये ६० पैसे इतका खरेदी दर मिळतो. एक मार्चपासून पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने प्रति पाँईंट फॅटसाठी ४ रुपये ४८ पैसे इतका दर देण्याचे ठरविले आहे. यामुळे संघातर्फे ६.० फॅट व ९.० एसएनएफ असलेल्या म्हशीच्या दुधासाठी प्रतिलिटर २६ रुपये ८८ पैसे इतका खरेदी दर देण्यात येणार आहे.