पुणे : आवक वाढल्याने कोथिंबीर, मेथी, शेपू, कांदापात, करडई, पुदिना, चुक्याच्या दरात घट झाली. लसूण, बटाटा, टोमॅटो, काकडी, शेवगा, फ्लॉवरच्या दरात घट झाली. अन्य फळभाज्यांचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मार्केट यार्डातील तरकारी विभागात रविवारी कोथिंबिरीच्या दीड लाख जुडी आणि मेथीच्या एक लाख जुडींची आवक झाली. घाऊक बाजारात कोथिंबिरेच्या जुडीमागे पाच रुपये, शेपू, कांदापातीच्या जुडीमागे चार रुपये, पुदीना तीन रुपये, मेथी आणि चुका प्रत्येकी दोन रुपये, करडईच्या जुडीमागे एक रुपयांनी घट झाली.

हेही वाचा…पुणे : अमनोरा पार्क परिसरातील बंद सदनिकेत आग

चाकवत, अंबाडी, मुळा, राजगिरा, चवळई, पालक, हरभरा गड्डीचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली घाऊक बाजारात शेकडा पालेभाज्यांचे दर कोथिंबीर ५०० ते १००० रुपये, मेथी ३०० ते ८०० रुपये, शेपू ३०० ते ६०० रुपये, कांदापात ४०० ते ८०० रुपये, चाकवत ४०० ते ७०० रुपये, करडई ३०० ते ६०० रुपये, पुदिना २०० ते ५०० रुपये, अंबाडी ३०० ते ७०० रुपये, मुळा ६०० ते १००० रुपये, राजगिरा ४०० ते ७०० रुपये, चुका ४०० ते ८०० रुपये, चवळई ३०० ते ७०० रुपये, पालक ८०० ते १५०० रुपये, हरभरा गड्डी ८०० ते १५०० रुपये असे असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prices of coriander fenugreek and other vegetables drop due to increased inflow pune print news rbk 25 psg
Show comments