पुणे : उन्हाळ्यात पालेभाज्यांच्या लागवडीवर परिणाम झाला असून, घाऊक बाजारात मागणीच्या तुलनेत पालेभाज्यांची आवक कमी प्रमाणावर झाली आहे. बाजारात पालेभाज्यांचा तुटवडा जाणवत असून, बहुतांश पालेभाज्यांचे दर कडाडले आहेत. किरकोळ बाजारात कोथिंबिरीच्या एका जुडीचे दर ५० रुपयांपर्यत जाऊन पोहोचले आहेत. मेथी, कांदापात, शेपू, मुळा या पालेभाज्यांचे दर तेजीत आहेत.

उन्हाळ्यामुळे पालेभाज्यांच्या लागवडीवर परिणाम झाला. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून घाऊक बाजारात पालेभाज्यांची आवक कमी प्रमाणावर होत आहे. मागणीच्या तुलनेत पालेभाज्यांची आवक कमी प्रमाणावर होत असल्याने पालेभाज्यांचे दर कडाडले असल्याची माहिती श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील पालेभाजी व्यापारी राजेंद्र सूर्यवंशी यांनी दिली.

retail inflation rate at 5 22 percent in december
चलनवाढीचा दिलासा, पण बेताचाच! डिसेंबरमध्ये दर ५.२२ टक्के; चार महिन्यांच्या नीचांकी
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Farmers halted auctions in Lasalgaon demanding immediate cancellation of onion export duty
निर्यात शुल्कविरोधात कांदा उत्पादक आक्रमक, लासलगाव बाजार समितीत लिलाव बंद पाडले
successful journey Anushka Jaiswal vegetable cultivation farming
कुत्सित बोलणी ते ‘मॅडम के खेत की मिरची’…अनुष्का जयस्वालचा यशस्वी प्रवास
Need to reconsider the guaranteed price policy
हमी भाव धोरणाच्या पुनर्विचाराची गरज
cotton price farmers are still facing problems
कापूस उत्‍पादकांची परवड ‘सीसीआय’नेही घटवले दर…
Kalyan-Dombivli water, amrit water channel,
कल्याण-डोंबिवलीत पाण्याचा ठणठणाट, अमृत जलवाहिनीचे काम सुरू असताना विद्युत वाहिका तुटली
tomato cauliflower cabbage ginger peas prices fall down
आले, टोमॅटो, मटार, फ्लॉवर, कोबीच्या दरात घट

हेही वाचा – डब्ल्यूएचओच्या अकरा सदस्यीय सल्लागार समितीच्या सहअध्यक्षपदी डॉ. भूषण पटवर्धन यांची नियुक्ती

पुण्यातील श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड, नवी मुंबईतील बाजार समितीत गेल्या पंधरा दिवसांपासून पालेभाज्यांचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे पालेभाज्यांचे दर वाढले आहेत. किरकोळ बाजारात कोथिंबिरीच्या एका जुडीचे दर ५० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. मेथीच्या एका जुडीचे दर ४० रुपये आहेत. कांदापात आणि शेपुच्या जुडीचे दर ३० रुपयांच्या पुढे आहेत. मेथी, शेपू, कोथिंबीर, कांदापात वगळता अन्य पालेभाज्यांच्या जुडीचे दर २५ रुपयांच्या पुढे आहेत. गुलटेकडी मार्केट यार्डातील पालेभाजी विभागात (तरकारी विभाग) पुणे जिल्हा, नाशिक, लातूर भागातून कोथिंबिरेची आवक होत आहे. रविवारी बाजारात कोथिंबिरीच्या एक लाख जुडींची आवक झाली. मेथीच्या ४० हजार जुडींची आवक झाली, असे त्यांनी नमूद केले.

बाजारात सध्या आवक होत असलेल्या पालेभाज्यांची प्रतवारी फारशी चांगली नाही. चांगल्या प्रतीच्या पालेभाज्यांचे दर वाढले आहेत. उन्हाळ्यात लागवडीसाठी पाणी न उपलब्ध झाल्याने बाजारात पालेभाज्यांची आवक कमी प्रमाणावर होत आहे. मोसमी पावसाचे आगमन झाले आहे. नवीन लागवडीस किमान महिनाभराचा कालावधी लागतो. पावसामुळे पालेभाज्यांच्या प्रतवारीवर परिणाम होतो. त्यामुळे पुढील महिनाभर पालेभाज्यांचे दर तेजीत राहतील, असे श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील पालेभाजीचे व्यापारी राजेंद्र सूर्यवंशी यांनी सांगितले.

हेही वाचा – मासळीच्या दरात घट; खवय्यांची चंगळ

घाऊक बाजारातील पालेभाज्यांचे शेकडा जुडीचे दर पुढीलप्रमाणे – कोथिंबीर – १५०० ते ३००० रुपये, मेथी – १५०० ते २५००, शेपू – ८०० ते १५०० रुपये, कांदापात – ६०० ते १५०० रुपये, चाकवत – ४०० ते १००० रुपये, करडई – ५०० ते ८०० रुपये, पुदिना – ३०० ते ८०० रुपये, अंबाडी – ४०० ते ८०० रुपये, मुळा – ८०० ते १२०० रुपये, राजगिरा – ४०० ते ८०० रुपये, चुका – ४०० ते १००० रुपये, चवळई -३०० ते ८०० रुपये, पालक – ८०० ते १६०० रुपये

किरकोळ बाजारात पालेभाज्यांचे दर

कोथिंबिर – ५० रुपये
मेथी – ४० रुपये
कांदापात – ३० रुपये
शेपू – ३० रुपये
मुळा – ३० ते ४० रुपये

Story img Loader