पुणे : गेल्या काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने घाऊक बाजारात गेल्या आठवड्याच्या तुलनेत रविवारी फळभाज्यांची आवक वाढली. कांदा, टोमॅटो, काकडी, कारली, वांगी, ढोबळी मिरची, घेवड्यासह सर्व फळभाज्यांच्या दरात १० ते २० टक्क्यांनी घट झाली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गुलटेकडी येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डात रविवारी (२७ ऑगस्ट) राज्य, तसेच परराज्यांतून १०० ते ११० ट्रक फळभाज्यांची आवक झाली. पावसाने उघडीप दिल्याने फळभाज्यांची आवक वाढली असून, बहुतांश फळभाज्यांच्या दरात घट झाल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. कर्नाटकमधून मिळून १० ते १२ टेम्पो हिरवी मिरची, गुजरात, कर्नाटकमधून मिळून ३ ते ४ टेम्पो कोबी, आंध्रप्रदेश आणि तामिळनाडूतून ४ ते ५ टेम्पो शेवगा, कर्नाटकातून ४ ते ५ टेम्पो घेवडा, गुजरातमधून १ टेम्पो भुईमूग शेंग, इंदूरमधून ६ ते ७ टेम्पो गाजर, मध्य प्रदेश आणि गुजरातमधून मिळून ८ ते १० टेम्पो लसूण, आग्रा, इंदूर, तसेच पुणे विभागातून मिळून ४० ते ४५ ट्रक बटाट्याची आवक झाली, अशी माहिती घाऊक बाजारातील प्रमुख अडते विलास भुजबळ यांनी दिली.

हेही वाचा – पुणे : दारू पिताना वाद झाला, मित्राचा खून केला; दोघांना पोलिसांकडून अटक

हेही वाचा – पुणे : दर कमी झाल्याने पालेभाज्यांना गृहिणींची पसंती

पुणे विभागातून सातारी आले ६०० ते ७०० गोणी, टोमॅटो नऊ ते दहा हजार पेटी, फ्लाॅवर ८ ते १० टेम्पो, कोबी ५ ते ६ टेम्पो, पुरंदर, वाई, सातारा भागातून मटार ७ ते ८ टेम्पो, भेंडी ६ ते ७ टेम्पो, गवार ६ ते ७ टेम्पो, कोबी ५ ते ६ टेम्पो, भुईमूग शेंग, १०० ते १२५ गोणी, ढोबळी मिरची १४ ते १५ टेम्पो, काकडी १० टेम्पो, तांबडा भोपळा १० ते १२ टेम्पाे, कांदा १०० ट्रक अशी आवक झाली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prices of most fruits and vegetables including onion tomato have come down vegetables are cheaper due to increase in imports pune print news rbk 25 ssb
Show comments