लोकसत्ता प्रतिनिधी
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
पुणे : मार्केट यार्डातील घाऊक बाजारात आवक वाढल्याने कांदा, टोमॅटो, फ्लॉवरच्या दरात १० ते १५ टक्क्यांनी घट झाली. शेवग्याच्या दरात घट झाली असून, अन्य फळभाज्यांचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.
श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील घाऊक बाजारात रविवारी राज्य, तसेच परराज्यातून मिळून ९० ट्रक फळभाज्यांची आवक झाली. कर्नाटक, गुजरात, आंध्र प्रदेशातून मिळून ८ ते १० टेम्पो हिरवी मिरची, कर्नाटक, गुजरातमधून मिळून प्रत्येकी ४ ते ५ टेम्पो कोबी, कर्नाटकातून ३ ते ४ टेम्पो पावटा, कर्नाटक आणि गुजरातमधून २ ते ३ टेम्पो घेवडा, आंध्र प्रदेश, तमिळनाडूतून मिळून २ ते ३ टेम्पो शेवगा, राजस्थानातून ९ ते १० टेम्पो गाजर, मध्य प्रदेशातून १८ ते २० ट्रक मटार, तामिळनाडूतून १ टेम्पो तोतापुरी कैरी, मध्य प्रदेशातून ९ ते १० टेम्पो लसूण अशी आवक परराज्यातून झाली, अशी माहिती मार्केट यार्डातील ज्येष्ठ अडते विलास भुजबळ यांनी दिली.
आणखी वाचा-स्वारगेट एसटी स्थानकात चोरट्यांचा सुळसुळाट; प्रवासी महिलेचे दागिने चोरीला
पुणे विभागातून सातारी आले ५५० ते ६०० गोणी, भेंडी ५ ते ६ टेम्पो, गवार ५ ते ६ टेम्पो, टोमॅटो ११ ते १२ हजार पेटी, हिरवी मिरची ४ ते ५ टेम्पो, ढोबळी मिरची ८ ते १० टेम्पो, काकडी ४ ते ५ टेम्पो, कोबी ५ ते ६ टेम्पो, फ्लाॅवर १० ते १२ टेम्पो, तांबडा भोपळा १४ ते १५ टेम्पो, कांदा १२५ ट्रक, तसेच इंदूर, आग्रा, स्थानिक भागातून ४० टेम्पो बटाट्याची आवक झाली.
कोथिंबिर, मेथी, शेपूच्या दरात घट
मेथी, कांदापात, शेपू, चुका या पालेभाज्यांच्या दरात घट झाली आहे. चाकवत, पुदिना, राजगिरा, अंबाडी, चवळई, पालक या पालेभाज्यांचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. मार्केट यार्डातील तरकारी विभागात कोथिंबीर दीड लाख जुडी, तसेच मेथीच्या ७० हजार जुडींची आवक झाली. घाऊक बाजारात पालेभाज्यांचे शेकड्याचे दर पुढीलप्रमाणे – कोथिंबीर- ४०० ते १०००, मेथी – ५०० ते ८००, शेपू – ५०० ते ८००, कांदापात- ८०० ते १२००, चाकवत – ५०० ते ८००, करडई- ३०० ते ७००, पुदिना – ५०० ते ८००, अंबाडी – ४०० ते ७००, मुळे – ८०० ते १५००, राजगिरा- ४०० ते ७००, चुका – ५०० ते ८००, चवळई- ४००-७००, पालक- ८००-१५००. हरभरा गड्डी – ५०० ते १०००
आणखी वाचा-हडपसर भागातील जुगार अड्ड्यावर छापा, आठजणांविरुद्ध गुन्हा दाखल
बोरांच्या दरात वाढ
मार्केट यार्डातील फळबाजारात बोरांच्या दरात ५ ते १० टक्क्यांनी वाढ झाली आहे. मोसंबी, कलिंगड, खरबूज,पपई आणि जुन्या बहारातील मोसंबीच्या दरात अल्पशी घट झाली आहे. पेरु, सीताफळ, अननस, चिकू, संत्री, नव्या बहरातील मोसंबीचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. फळबाजारात रविवारी जुन्या आणि नव्या बहरातील मोसंबी ४० टन, संत्री ७० ते ८० टन, डाळिंब २५ ते ३० टन, पपई ३० ते ४० टेम्पो, लिंबे दोन हजार गोणी, कलिंगड ७० ते ८० टन, खरबूज ३ ते ४ टेम्पो, चिकू एक हजार गोणी, पेरू ८०० ते ९०० प्लास्टिक जाळी (क्रेट), बोरे ७०० गोणी, सीताफळ १० ते १५ टन अशी आवक झाली.