पुणे : बीएमसीसी माजी विद्यार्थी संघटनेच्या वतीने अभिनेते प्रसाद ओक आणि पीएनजी ज्वेलर्सचे संचालक सौरभ गाडगीळ यांना ‘प्राईड ऑफ बीएमसीसी’ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. बीएमसीसीमधील डी.जी. कर्वे संशोधन अध्यासन केंद्राच्या प्रमुख डॉ. वसुधा गर्दे आणि माजी उपप्राचार्य डॉ. संजय कंदलगावकर या दोन निवृत्त प्राध्यापकांचा बीएमसीसी गुरुवर्य पुरस्काराने गौरव केला जाणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महाविद्यालयाच्या टाटा सभागृहात रविवारी (९ फेब्रुवारी) होणाऱ्या माजी विद्यार्थी मेळाव्यात ज्येष्ठ अभिनेते अभिनेते मोहन जोशी आणि राज्याचे जमाबंदी व भूमी अभिलेख आयुक्त डॉ. सुहास दिवसे यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत, अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष अरुण निम्हण, सचिव सुहास पटवर्धन आणि प्राचार्य डाॅ. राजेश कुचेकर यांनी दिली.

याच कार्यक्रमात व्यावसायिक रायकुमार नहार यांना उद्योगभूषण पुरस्कार, एअर व्हाईस मार्शल (निवृत्त) जयंत इनामदार यांना शहीद मेजर कुणाल गोसावी शौर्य पुरस्कार, पत्रकार प्रसाद पानसे यांना वरुणराज भिडे पुरस्कार, अभिनेता अथर्व कर्वे याला सुहास कुलकर्णी नाटय पुरस्कार, गायिका अमृता खाडीलकर – नातू यांना बाळासाहेब सरपोतदार पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. टेनिसपटू वैष्णवी आडकर, रोलर स्केटींगपटू मृगनयनी शिंदे यांचा शिवराम फळणीकर पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे.