लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे: महात्मा गांधी यांनी इंग्रजांपासून देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. इंग्रज देशातून गेल्यानंतरही इंग्रजीचा प्रभाव कायम आहे. इंग्रजी ही जागतिक संवादाची भाषा आहे. मात्र बहुतांश देशांमध्ये त्यांच्या मातृभाषेतून शिक्षण होते. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी इंग्रजीपासून देशाची सुटका करत आहेत, असे विधान शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी मांडले.

जी-२० परिषदेतील शिक्षण कार्यगटाच्या बैठकीच्या अनुषंगाने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आयोजित शिक्षण साधने प्रदर्शनाचे उद्घाटन केंद्रीय शालेय शिक्षण राज्यमंत्री अन्नपूर्णा देवी यांच्या हस्ते झाले. राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, केंद्रीय शालेय शिक्षण सचिव संजय कुमार आदी या वेळी उपस्थित होते.

आणखी वाचा-पुणे: ‘NDA’तील उच्चपदस्थ अधिकार्‍याला मारहाण

केसरकर म्हणाले, पारंपरिक शिक्षण नोकरी देऊ शकत नाही. त्यामुळे कौशल्य शिक्षण अत्यावश्यक आहे. तसेच मुलभूत आकलन आणि संख्याशास्त्र महत्त्वाचे आहे. विद्यार्थ्यांना श्रमांचे महत्त्व कळले पाहिजे. राज्यातील शिक्षणात पहिलीपासून स्काऊट गाईड आणि शेती या विषयांचा समावेश केला आहे. देशातील शिक्षण संस्था स्वयंपूर्ण झाल्या पाहिजे.