पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात चाळीस जवान शहीद झाले. यानंतर पाकिस्तानला जशास तसे उत्तर वायुसेनेने दिले. मात्र जर देशाकडे राफेल विमानं असती तर निकाल वेगळा लागला असता असं म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वायुसेनेच्या कामगिरीवर शंका उपस्थित केली आहे. त्यामुळे त्यांनी वायुसेनेची माफी मागावी अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
पुलवामा हल्ल्यात चाळीस जवान शहीद झाल्यानंतर संपूर्ण देश शोकसागरात बुडला होता. मात्र तेव्हा पंतप्रधान भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यात धन्यता मानली. तसंच या दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारकडून योग्य ती पावले उचलण्याची आवश्यकता असताना. त्या दरम्यान शहीद जवानांवरुन भाजपकडून राजकारण केले गेले आहे. आपल्या देशावर अनेक सरकारं आली पण अशा प्रकारचे शहीदांच्या मृत्यूचे राजकारण पाहण्यास मिळाले नाही आणि कोणी केले नाही, अशा शब्दात पंतप्रधानावर त्यांनी निशाणा साधला.
प्रकाश आंबेडकरानी कुरापती काढू नये : पृथ्वीराज चव्हाण<br />आम्ही आरएसएसवर बोलत नाही किंवा कारवाई करीत नाही हे विधान प्रकाश आंबेडकराचे चुकीचे आहे. त्यांनी जावई शोध लावू नये. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आरएसएसविरोधात दोन वेळा गुन्हा दाखल केला होता. त्यामुळे अशा प्रकारच्या प्रकाश आंबेडकरानी कुरापती काढू नये. अशी भूमिका पृथ्वीराज चव्हाण यांनी मांडत. प्रकाश आंबेडकरांनी सल्ला दिला.