पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा निश्चित करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पंतप्रधान कार्यालयाकडून हा दौरा प्राप्त झाला आहे. त्यानुसार पंतप्रधान मोदी हे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात ‘श्रीं’च्या मूर्तीला अभिषेक करणार आहेत. त्यानंतर लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार कार्यक्रम आणि विविध विकासकामांचे लोकार्पण, भूमिपूजन मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने पंतप्रधान मोदी यांना यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. या कार्यक्रमासह श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर आणि विविध विकासकामांचे लोकार्पण, भूमिपूजन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. मंगळवारी (१ ऑगस्ट) सकाळी दिल्ली येथून लोहगाव विमानतळावर पंतप्रधान मोदी यांचे आगमन होईल. लोहगाव विमानतळावरून शिवाजीनगर भागात तयार करण्यात आलेल्या हेलिपॅडवर त्यांचे हेलिकॉप्टरने आगमन होईल.

त्यानंतर श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात आगमन होईल. मोदींच्या हस्ते ‘श्रीं’च्या मूर्तीला अभिषेक करण्यात येणार आहे. त्यानंतर स. प. महाविद्यालय येथे लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने पंतप्रधान मोदी यांना गौरविण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी शिवाजीनगर येथील कार्यक्रमात विविध विकासकामांचे लोकार्पण, भूमिपूजन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. त्यानंतर लोहगाव विमानतळावरून पंतप्रधान मोदी दिल्लीकडे प्रयाण करणार आहेत, असे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prime minister narendra modi visit to pune is confirmed amy