लोकसत्ता प्रतिनिधी

पिंपरी: चिंचवड येथे साकारण्यात येणाऱ्या क्रांतिकारी चापेकर बंधूंचे स्मारक पूर्ण करण्यासाठी ४१ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे स्मारकाच्या कामाचा आढावा घेण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीला खासदार श्रीरंग बारणे, आमदार अश्विनी जगताप, पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह, क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीचे अध्यक्ष गिरीश प्रभुणे उपस्थित होते.

land acquisition for ring road
रिंग रोडसाठी २०० हेक्टर भूसंपादन बाकी; ५०० कोटींच्या निधीची रस्ते विकास महामंडळाकडे मागणी
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Pune, sewage channels covering Pune, Pune Municipal Corporation, sewage pune, pune latest news,
पुणे : सांडपाणी वाहिन्यांची झाकणे समपातळीवर आणण्यासाठी महापालिकेने उचलले पाऊल !
Thane Water pipe connection, Thane arrears Water connection, Thane Water, Thane latest news, Thane marathi news,
ठाण्यात थकाबाकीदारांच्या १७८० नळजोडण्या खंडीत, ठाणे महापालिकेची कारवाई
Independent MLA Sharad Sonawane.
MLA Sharad Sonawane : अपक्ष आमदाराची महायुतीकडे मंत्रिपदाची मागणी, विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसत झळकावला फलक
loksatta readers feedback
लोकमानस: …त्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी!
ministerial post, west varhad, vidarbha
पश्चिम वऱ्हाडात मंत्रिपदाची कुणाला ‘लॉटरी’?
maharashtra cabinet expansion before nagpur session
मंत्रिमंडळ विस्तार नागपूर अधिवेशनापूर्वी; मुख्यमंत्री फडणवीस यांचे संकेत, ११ किंवा १२ तारखेला शक्यता

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, क्रांतिकारी चापेकर बंधूचे स्मारक लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी आवश्यक निधी शासनाकडून देण्यात येईल. यासाठी महापालिकेने तातडीने शासनाकडे प्रस्ताव पाठवावा. आयुक्त शेखर सिंह यांनी स्मारकाच्या कामाचे सादरीकरण केले.

आणखी वाचा-श्रीमंत दगडूशेठ गणपती ट्रस्टतर्फे गणेशोत्सवात अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराची भव्य प्रतिकृती साकारणार

उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार

प्रभुणे यांनी स्मारकाच्या उभारणीची आतापर्यंतची वाटचाल मांडली. तसेच स्मारकाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रित करण्यात आले असून त्यांनी येण्यास मान्यता दिल्याचे सांगितले.

तिसऱ्या टप्प्याचे काम सुरू

चिंचवडगाव येथे क्रांतिवीर चापेकर बंधुचा जुनावाडा ही पुरातन ऐतिहासिक वास्तू होती. हा वाडा मोडकळीस आल्यामुळे क्रांतिवीर चापेकर यांची पुरातन वास्तू नव्याने उभारण्यासाठी राज्य सरकारकडून १२ जून १९९७ रोजी क्रांतिवीर चापेकर बंधुंचे स्मारक उभारण्याबाबत पिंपरी-चिंचवड महापालिकेला आदेश प्राप्त झाले. त्यानुसार, सन १९९७ मध्ये स्मारकाचे पहिल्या टप्प्याअंतर्गत फाऊंडेशन करण्यात आले. दुस-या टप्प्याचे काम सन २००१ मध्ये करण्यात आले. स्मारकाचे उर्वरित काम पूर्ण करण्यासाठी तिस-या टप्प्याचे काम सुरू आहे.

Story img Loader