पुणे : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी एक ऑगस्ट रोजी लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारण्यासाठी पुण्यात येणार आहेत. या दौऱ्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेणार आहेत. तसेच टिळक स्मारक येथे लोकमान्य टिळक यांना अभिवादन करणार आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे दौऱ्यात लोकमान्य टिळक पुरस्काराच्या कार्यक्रमासह अन्य काही कार्यक्रमही होणार आहेत. त्यात महापालिकेने आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी २०१८ मध्ये पाच वेगवेगळ्या भागात पंतप्रधान आवास योजना सुरू केली आहे. त्यानुसार पूर्ण झालेल्या घरांचे पंतप्रधान नरेद्र मोदी यांच्या हस्ते १ ऑगस्ट रोजी लोकार्पण होणार असून शिवाजीनगर येथील पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर हा कार्यक्रम होणार आहे.

 लोहगाव विमानतळावरून पंतप्रधान नरेद्र मोदी हे हेलिकॉप्टरने सिंचन भवन येथे येणार आहेत. पंतप्रधानांच्या पुणे दौऱ्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त, महापालिका आयुक्तांची बैठक झाली. तसेच त्यांनी मोदी यांच्या लोहगाव ते कार्यक्रम स्थळ या मार्गाची पाहणी केली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prime minister narendra modi will visit rich dagdusheth halwai ganpati pune print news ccp 14 ysh