PM Modi Pune Maharashtra Visit Cancelled due to Heavy Rain : पुणे शहरातील मेट्रोचा महत्त्वाचा टप्पा असलेल्या शिवाजीनगर जिल्हा सत्र न्यायालय ते स्वारगेट भुयारी मार्गाचे लोकार्पण,तर स्वारगेट ते कात्रज या विस्तारित भुयारी मार्गाचे भूमिपूजन कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज एस. पी. कॉलेजच्या मैदानावर होणार होता. मात्र मागील दोन दिवसापासून पुणे शहरातील मुसळधार पाऊस पडत आहे आणि आज ऑरेंज अलर्ट दिल्याने, एकूणच शहरातील पावसाची परिस्थिती लक्षात घेतल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुणे दौरा रद्द करावा लागला आहे. याबाबत ट्विट देखील करण्यात आले आहे.

एस पी कॉलेजच्या मैदानावर नरेंद्र मोदी यांचा भव्य दिव्य असा कार्यक्रम होणार होता. त्या दृष्टीने प्रशासनामार्फत जय्यत तयारी देखील करण्यात आली होती. मात्र दोन दिवसापासून शहरात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. तर कार्यक्रमाच्या ठिकाणी देखील पाऊस झाल्याने मोठ्या प्रमाणावर चिखल पाहण्यास मिळत आहे. त्या पार्श्वभूमीवर मैदानावर खडी टाकून, सव्वा फुटाचा लाकडी फ्लॅट फॉर्म देखील तयार करण्याचे काम सुरू होते. जेणेकरून कार्यक्रमाच्या ठिकाणी येणार्‍या लोकांना कोणताही त्रास होता कामा नये. याबाबतची काळजी देखील घेण्यात आली होती. मात्र तरी देखील शहरात आज पाऊस सुरू झाल्याने, जिल्हा प्रशासनामार्फत दुसरा पर्याय म्हणून स्वारगेट मेट्रो स्टेशन जवळील गणेश कला क्रिडा रंगमंच येथे कार्यक्रमाची तयार करण्यात आली होती. मात्र त्या ठिकाणी कार्यक्रम होणार, याबाबत कोणत्याही प्रकारची घोषणा करण्यात आली नव्हती. पण अखेरच्या क्षणी कार्यक्रम त्या ठिकाणी होण्याची शक्यता वर्तविली जात होती.

आणखी वाचा-PM Narendra Modi Pune Visit : पंतप्रधान मोदी आज पुणे दौऱ्यावर, शहातील वाहतूक व्यवस्थेत बदल

या सर्व घडामोडी दरम्यान पुणे शहरातील जोरदार पाऊस आणि एकूणच मैदानाची परिस्थिती लक्षात घेऊन अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुणे दौरा करावा लागला आहे. मात्र या एकूणच उद्घाटन आणि भूमिपूजन सोहळयासाठी कोट्यावधी रुपयांचा करण्यात आलेला खर्च खऱ्या अर्थाने पाण्यात गेल्याचे बोलले जात आहे.