पुणे : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या योजनांबाबत जनजागृती करण्यासाठी आयोजित भारत संकल्प यात्रा कसबा विधानसभा मतदारसंघाभोवती केंद्रित केल्याचे स्पष्ट होत आहे. कसबा विधानसभा निवडणुकीतील भाजपाच्या पराभवामुळे कसब्यातील बहुतांश ठिकाणी ही यात्रा आयोजित केली जाणार आहे.

लोकसभेची आगामी निवडणूक मार्च-एप्रिल महिन्यात होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर शासकीय योजनांचा लाभ नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी केंद्र सरकारचा खटाटोप सुरू झाला आहे. त्यासाठी केंद्र सरकारने महापालिकेच्या माध्यमातून हा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातही कसबा विधानसभा मतदारसंघात केंद्राच्या योजनांची जनजागृती केली जाणार आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या उपस्थितीत गुरुवारी कार्यक्रम होणार असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी दूरचित्रसंवाद पद्धतीने उपस्थितांबरोबर संवाद साधणार आहेत.

Expedite work of houses under PMAY in Maha says cm fadnavis
प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुलांच्या कामांना गती देण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Mahakumbh , Prayagraj , Railway, Plane,
प्रयागसाठी ‘प्रयाण’ सुरूच! हवाई, रेल्वे, खासगी वाहनांचे आरक्षण फुल्ल
Nanded District , Government Agricultural College,
अशोक चव्हाणांच्या पक्षांतरामुळेच कृषी महाविद्यालयाला शंकरराव चव्हाणांचे नाव
Udayanraje Bhosale statement On Chhaava Movie release
आक्षेपार्ह बाबी वगळून ‘छावा’ प्रदर्शित करावा : उदयनराजे
Special campaign for the conservation of Kanheri Caves
कान्हेरी लेणीच्या संवर्धनासाठी विशेष मोहीम; पर्यटनदृष्ट्या विकसित करणार; खासदार पीयूष गोयल यांची घोषणा
competition between Ashok Chavan and Pratap Patil Chikhlikar over party defection
अशोक चव्हाण – चिखलीकरांमध्ये पक्षांतरावरून स्पर्धा
Mahakumbh ISRO Images
ISRO ची कमाल! थेट अवकाशातून टिपली महाकुंभची छायाचित्रे, पाहा झलक

हेही वाचा – पुण्यात मनसैनिक इंग्रजी पाट्यांविरोधात आक्रमक, अनेक दुकानांवर दगडफेक

हेही वाचा – कात्रजचे दूध आजपासून दोन रुपयांनी स्वस्त

शहरातील १२५ ठिकाणी फिरत्या वाहनाच्या माध्यमातून नवीन लाभार्थ्यांची नोंदणी करणे, जनजागृती करणे, योजनांचा लाभ मिळवून देणे अशी कामे करण्यात येणार आहेत. महापालिकेने निश्चित केलेल्या ठिकाणी फिरते वाहन तीन तास थांबणार असून, त्याचे नियोजन क्षेत्रीय कार्यालयाकडे देण्यात आले आहे. मात्र पहिल्या टप्प्यात कसबा विधानसभा मतदारसंघाला प्राधान्य देण्यात आले आहे.

Story img Loader