लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे: येरवडा कारागृहात शिक्षा भोगत असलेले काही कैदी उच्चशिक्षित आहेत. त्यांच्या ज्ञानाचा वापर विधायक कार्यासाठी करुन घेण्यासाठी पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने शिक्षा झालेल्या कैद्यांना कायद्याचे शिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. येरवडा कारागृहातील २० कैद्यांची विधी स्वयंसेवक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

येरवडा कारागृहात विनामूल्य कायदेविषयक मार्गदर्शन आणि समुपदेशन केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडून २० कैद्यांची विधी स्वयंसेवक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्राचे कामकाज सुरू झाल्यानंतर पहिल्याच दिवशी कैद्यांनी ५० अर्ज सादर केले, अशी माहिती पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव सोनल पाटील यांनी दिली.

आणखी वाचा-जंगलांना आग लागण्याचे प्रमाण घटले

शिक्षेचा उद्देश कैद्यांचा पुनर्वसनासाठी आहे. जे कैदी दीर्घकाळ कारागृहात शिक्षा भोगत आहेत. त्यांचा वर्तणूक अहवाल मागविण्यात आला होता. काही कैदी अभियंते, डाॅक्टर आहेत. त्यांना कायद्याचे ज्ञान आहे. अशा कैद्यांची विधी स्वयंसेवक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, असे त्यांनी नमूद केले.

कारागृहातील कायदेविषयक मार्गदर्शन आणि समुपदेशन केंद्राचे उद्घाटन नुकतेच झाले. शिवाजीनगर जिल्हा सत्र न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश श्याम चांडक, जिल्हा सत्र न्यायाधीश ए. एस. वाघमारे, कारागृह विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर, सहायक संचालक संध्या काळे, कारागृह अधीक्षक सुनील ढमाळ आदी उपस्थित होते.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prisoners will now give knowledge of law to prisoners pune print news rbk 25 mrj
Show comments