लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुणे: राज्यातील कारागृहांवर आता ड्रोन कॅमेऱ्यांची नजर राहणार आहे. ड्रोन कॅमेऱ्यांद्वारे कारागृहाच्या आवारातील अंतर्गत सुरक्षा आणि कैद्यांच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येणार आहे. उत्तर प्रदेशानंतर कारागृहाच्या आवारात टेहळणीसाठी ड्रोन कॅमेऱ्यांचा वापर करणारे महाराष्ट्र देशातील दुसरे राज्य ठरणार आहे.

पहिल्या टप्प्यात राज्यातील १२ कारागृहांतील अंतर्गत सुरक्षेसाठी ड्रोन कॅमेऱ्यांचा वापर करण्यात येणार आहे. उत्तर प्रदेशनंतर ड्रोन कॅमेऱ्यांचा वापर करणारे महाराष्ट्र दुसरे राज्य ठरणार आहे, अशी माहिती कारागृहाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक अमिताभ गुप्ता यांनी पत्रकार परिषदेत दिली. कारागृह विभागाच्या उपमहानिरीक्षक स्वाती साठे, उपमहानिरीक्षक सुनील ढमाळ, येरवडा कारागृह अधीक्षक राणी भोसले, प्राचार्य दौलतराव जाधव, तुरुंग अधिकारी प्रशिक्षण महाविद्यालयाचे प्रमुख चंद्रमणी इंदुरकर आदी या वेळी उपस्थित होते.

हेही वाचा… पिंपरी महापालिकेकडून अभ्यास गटाची स्थापना, आयुक्त शेखर सिंह यांची माहिती

कारागृहाची सुरक्षा सक्षम करण्यासाठी ड्रोन कॅमेऱ्यांचा वापर करण्यात येणार आहे. ड्रोन कॅमेऱ्यांद्वारे कारागृहाच्या परिसरात रात्रीही चित्रीकरण करता येणार आहे. ड्रोन कॅमेऱ्यांमुळे कारागृहातील प्रत्येक घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवणे शक्य होणार आहे. प्रायोगिक तत्त्वावर येरवडा मध्यवर्ती कारागृह, कोल्हापूर, नाशिक, संभाजीनगर, तळोजा, ठाणे, अमरावती, नागपूर, कल्याण आणि चंद्रपूर येथील कारागृहात टेहळणीसाठी ड्रोन कॅमेऱ्यांचा वापर करण्यात येणार असल्याचे गुप्ता यांनी नमूद केले.

“केंद्रीय गृह मंत्रालयाने कारागृहाची सुरक्षा, तसेच सुरक्षाविषयक उपाययोजना सक्षम करण्यासाठी काही मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. त्यानुसार राज्यातील १२ कारागृहांत प्रायोगिक तत्त्वावर ड्रोन कॅमेऱ्यांचा वापर करण्यात येणार आहे.” – अमिताभ गुप्ता, अतिरिक्त पोलीस महासंचालक आणि महानिरीक्षक, कारागृह आणि सुधार सेवा

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prisons will be monitored by drone cameras in pune pune print news rbk 25 dvr