पुणे : तब्बल वीस मिनिटे पाण्याचा फवारा करून अग्निशमन दलाच्या जवानांनी खासगी बसला लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळविले. हडपसर येथे कदम बाग वस्तीलगत (सोलापूर महामार्ग) येथे एका बसला आग लागल्याची घटना सकाळी नऊच्या सुमारास घडली. माहिती मिळताच अग्निशमन दलाकडून हडपसर आणि पीएमआरडीए येथून अग्निशमन वाहन रवाना करण्यात आले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

घटनास्थळी पोहोचताच जवानांनी पाहिले की, एका खाजगी बसने मोठ्या प्रमाणात पेट घेतला आहे. त्याचवेळी जवानांनी प्रथम बसमध्ये कोणी आहे का याची खात्री करून घेतली. पाण्याचा मारा करत सुमारे वीस मिनिटांत आग पूर्ण विझवत धोका दूर केला. या घटनेत जखमी कोणी नसून या बसमधील १४ प्रवासी आणि वाहनचालक सुरक्षित आहेत. बस पूर्ण जळाल्याने प्रवाशांचे सामान आणि डिक्कीमधील एक दुचाकी देखील जळाली आहे.

हेही वाचा – राज्यातील साडेचारशे जणांची दिव्यांग प्रमाणपत्रे बोगस? आमदार बच्चू कडू यांच्याकडून शोध अभियान

हेही वाचा – पुणे : दारुसाठी पैसे मागण्याच्या वादातून अल्पवयीनांकडून गुंडाचा खून, रामटेकडी परिसरातील घटना

या कामगिरीत अग्निशमन अधिकारी प्रमोद सोनावणे तसेच वाहनचालक नारायण जगताप, जवान बाबा चव्हाण, अनिकेत तारु, अविनाश ढाकणे, रामदास लाड व पीएमआरडीएचे वाहनचालक संदिप शेळके, जवान लक्ष्मण मिसाळ, आकाश राठोड, सुरज इंगवले, संकेत कुंभार यांनी सहभाग घेतला.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Private bus caught fire in hadapsar control of fire by fire brigade pune print news vvk 10 ssb