संजय जाधव

पुणे : दिवाळीनिमित्त पुण्यातून मूळ गावी जाणाऱ्या विद्यार्थी आणि नागरिकांची संख्या मोठी असते. त्यामुळे या काळात सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसह खासगी वाहतुकीला मोठी गर्दी असते. याच गर्दीचा फायदा घेऊन खासगी प्रवासी बसमालकांनी प्रवाशांची लूट सुरू केली आहे. याला आळा घालण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) एसटीचे दर जाहीर करून त्यावर दीडपट भाडे आकारण्याच्या सूचना केल्या आहेत. मात्र, बस संघटनांनी आरटीओनेच बसचे भाडे निश्चित करून द्यावे, अशी भूमिका घेतल्याने कोंडी निर्माण झाली आहे.

Kangana Ranaut criticism that Priyanka Gandhi has no respect for democracy
प्रियंका गांधीना लोकशाहीचा आदर नाही,कंगना रानौतची टीका..
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
dcm devendra fadnavis criticized congress mla ravindra dhangekar
‘कसब्या’तील आमदारांची कामे कमी आणि दंगा जास्त; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची टीका
jharkhand assembly election 2024 amit shah attack at rahul gandhi
झारखंडमध्ये ‘राहुल विमान’ कोसळणार! केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची टीका
Narendra Modi statement regarding the middle class in a meeting in Pune news
पंतप्रधानांची मध्यमवर्गाला साद; ‘मध्यमवर्गाची प्रगती होते, तेव्हा देश प्रगती करतो’; पुण्यातील सभेत विधान
state govt form committee to study implementation sub classification in sc reservation sparks controversy
दलित मतदारांत दुभंग? आरक्षण उपवर्गीकरणाच्या हालचालींचे पडसाद निवडणुकीत उमटण्याची शक्यता
young adults prefer to invest in stocks directly rather than mfs report by fin one
म्युच्युअल फंडापेक्षा तरुणाईचा कल थेट समभागांत गुंतवणुकीकडे; ९३ टक्के कमावत्या तरुणांत मासिक बचतीची सवय

पुण्याहून दररोज सुमारे पाचशेहून अधिक खासगी बस महाराष्ट्राच्या विविध भागांत जातात. या व्यतिरिक्त मुंबईहून येणाऱ्या पाचशे खासगी बस पुण्यातून पुढे मार्गस्थ होतात. पुण्यातून जाणाऱ्या प्रवाशांमध्ये विदर्भ आणि मराठवाड्यातील प्रवाशांची संख्या अधिक असते. दिवाळीच्या काळात गावी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या खूप मोठी असते. प्रवाशांची संख्या वाढण्याच्या काळात बसचे भाडे वाढविण्याचे प्रकार केले जातात. दिवाळीच्या तोंडावर आता खासगी बसचालकांनी भाडे दुपटीहून अधिक वाढविले आहे. यामुळे प्रवाशांना मोठा भुर्दंड बसत आहे.

आणखी वाचा-कुणबी जात प्रमाणपत्र देण्यासाठी पिंपरी महापालिका नोंदी शोधणार

खासगी प्रवासी बसला एसटी बसच्या प्रतिकिलोमीटर भाडेदराच्या दीडपट भाडे आकारता येते. याबाबतचे कमाल भाडेदर सरकारने २७ एप्रिल २०१८ रोजी निश्चित केले आहेत. काही खासगी प्रवासी बस सणासुदीच्या व गर्दीच्या हंगामामध्ये प्रवाशांकडून मनमानी भाडे आकारत असल्याच्या तक्रारी येत आहेत. या पार्श्वभूमीवर प्रादेशिक परिवहन कार्यालयाने दिवाळीच्या काळातील एसटीचे दर जाहीर केले आहेत. त्यावर दीडपट भाडे आकारणी करावी, अशी सूचना खासगी बसना करण्यात आली आहे. त्याचे पालन न केल्यास कारवाईचाही इशारा देण्यात आला आहे. मात्र, बस संघटनांनी आरटीओने अधिकृतपणे बसचे दर निश्चित करावेत, ही आधीची मागणी लावून धरली आहे. अधिकृत दर नसल्याने आमच्यावर कारवाई केली जाते. त्यामुळे अधिकृत दर असल्यास आमच्यावरील कारवाई टळेल आणि भाडे आकारणीत सुसूत्रता येईल, असा दावा संघटनेने केला आहे.

दिवाळीच्या काळातील एसटी बसचे दर जाहीर केले आहेत. त्याच्या दीडपट भाडे आकारणी खासगी बस करू शकतात. त्यात रेड बस आणि अभिबस यांसारख्या मोबाइल ॲप्लिकेशनद्वारे सेवा देणाऱ्या कंपन्यांचाही समावेश आहे. याचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. -संजीव भोर, प्रभारी प्रादेशिक परिवहन अधिकारी

आणखी वाचा-पुणे: विद्यापीठाच्या परिसरात जमावबंदी; हाणामारी, मोर्चांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा आदेश

खासगी प्रवासी बसचे भाडे दर निश्चित करण्याची मागणी आम्ही आरटीओकडे केली होती. आरटीओने दर निश्चित न करता एसटीचे दर आम्हाला कळविले आहेत. आरटीओनेच आम्हाला अधिकृतरीत्या दिवाळीसाठी खासगी प्रवासी बसचे भाडे निश्चित करून द्यावे, अशी आमची मागणी आहे. -बाळासाहेब खेडेकर, अध्यक्ष, पुणे डिस्ट्रिक्ट लक्झरी बस असोसिएशन

इथे करा तक्रार!

बसचालकाने जादा भाडे आकारल्याची तक्रार प्रवाशांना थेट आरटीओकडे करता येईल. ही तक्रार व्हॉट्सॲप क्रमांक : ८२७५३३०१०१ अथवा ई-मेल : buscomplaint.rtopune@gmail.com येथे पाठवावी. तक्रारीत प्रवाशाचे पूर्ण नाव, मोबाइल क्रमांक, प्रवासाचा मार्ग, बस क्रमांक, बसचा प्रकार, बसचे छायाचित्र आणि तिकिटाचे छायाचित्र आदी तपशील द्यावे लागतील.

एसटीचे दिवाळीच्या काळातील भाडे (८ ते २७ नोव्हेंबर)

मार्गसाधी सेवाशिवनेरी
पुणे-नागपूर११९०२४०५
पुणे -नाशिक३४५७००
पुणे-छत्रपती संभाजीनगर३७५७५५
पुणे – मुंबई २७० ५४५
पुणे – कोल्हापूर</td>३६५ ७३५