पुणे : मराठा आरक्षण आंदोलनामुळे राज्यातील अनेक भागांत एसटीची सेवा बंद आहे. याचा फायदा खासगी प्रवासी बसचालकांनी घेतला आहे. दिवाळीच्या तोंडावर गावी जाणाऱ्या प्रवाशांकडून दुप्पट भाडे खासगी बसचालक घेत आहेत. प्रवाशांची लूट सुरू असताना प्रादेशिक परिवहन विभाग आणि वाहतूक पोलिसांकडून मात्र याकडे दुर्लक्ष केले जात आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
दिवाळीनिमित्त पुण्यातून मूळ गावी जाणाऱ्या विद्यार्थी आणि नागरिकांची संख्या मोठी असते. त्यातच मराठा आरक्षण आंदोलनामुळे अनेक ठिकाणची एसटी सेवा बंद आहे. याचा फायदा घेऊन खासगी प्रवासी बसचालकांनी प्रवाशांची लूट सुरू केली आहे. बसचालकांनी दिवाळीच्या काळासाठी जादा भाडे आकारण्यास सुरुवात केली आहे. प्रवाशांना एसटीचा पर्याय नसल्याने जास्त पैसे देऊन खासगी बसने प्रवास करावा लागत आहे.
पुण्याहून दररोज सुमारे पाचशेहून अधिक खासगी बस महाराष्ट्राच्या विविध भागांत जातात. या व्यतिरिक्त मुंबईहून येणाऱ्या पाचशे खासगी बस पुण्यातून पुढे मार्गस्थ होतात. पुण्यातून जाणाऱ्या प्रवाशांमध्ये विदर्भ आणि मराठवाड्यातील प्रवाशांची संख्या अधिक असते. दिवाळीच्या काळात गावी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या खूप मोठी असते. खासगी प्रवासी बसला एसटी बसच्या तिकिटाच्या दीडपट भाडे आकारता येते. त्याचे उल्लंघन खासगी बसचालकांकडून होत आहे. मात्र, जास्त भाडे आकारणाऱ्या खासगी बसवर आरटीओ आणि वाहतूक पोलिसांकडून कोणतीही कारवाई होताना दिसत नाही.
हेही वाचा – पुणे : स्ट्रक्चरल ऑडिटवर सीओईपीने दाखवले महामेट्रोकडे बोट
एसटीला दररोज ५ कोटींचा फटका
स्थानिक पोलीस प्रशासनाने दिलेल्या सुचनेनुसार, खबरदारीचा उपाय म्हणून मराठवाड्यातील परभणी, धाराशिव, लातूर, जालना, नांदेड, बीड, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांतील सर्व एसटी वाहतूक गुरुवारी बंद होती. याचबरोबर सोलापूर व अहमदनगर जिल्ह्यातील वाहतूक अंशतः बंद होती. राज्यातील ६४ आगारांची वाहतूक पूर्णतः बंद होती. त्यामुळे १६ हजार ७०० पेक्षा जास्त फेऱ्या बंद ठेवण्यात आल्या. गेल्या काही दिवसांत १०० पेक्षा जास्त एसटी गाड्यांची मोडतोड करण्यात आली तर ४ गाड्यांची जाळपोळ केली आहे. त्यामुळे एसटीचे सुमारे ५ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. तसेच, वाहतूक बंद असल्याने दररोज एसटीचा ५ ते ५.५ कोटी रुपयांचा तिकीट महसूल बुडाला आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे जनसंपर्क अधिकारी अभिजित भोसले यांनी दिली.