आपत्कालीन वैद्यकीय सेवेतील आव्हानांवर मात करण्यासाठी पुण्यातील खासगी रुग्णालयांनी एकत्रितपणे पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. सोसायटी ऑफ इमर्जन्सी मेडिसीनच्या सहकार्याने ज्युपिटर हॉस्पिटलने यासाठी पुढाकार घेतला आहे. हृदयरोग आणि श्वसनविकाराचा वाटा एकूण मृत्युदरात ४२ टक्के आहे. याच वेळी गंभीर दुखापत आणि विषबाधा यांचा वाटा ५.६ टक्के आहे.

हेही वाचा >>> कोविडच्या संशोधनाची दारे संशोधकांसाठी खुली! पुणे नॉलेज क्लस्टरचा कोविड वैद्यकीय विदासंच; दोन हजार रुग्णांचा समावेश

Queues of citizens, Dombivli Civic Facility Center,
कर्मचाऱ्यांअभावी डोंबिवली नागरी सुविधा केंद्रात जन्म-मृत्यू दाखल्यांसाठी नागरिकांच्या रांगा
4th October Rashi Bhavishya in marathi
४ ऑक्टोबर पंचांग: मेष, वृषभसह ‘या’ राशींवर देवी…
tanishk vice president arun narayan
‘नैसर्गिकच्या तुलनेत कृत्रिम हिऱ्यांना अनेकांगी मर्यादा’; तनिष्कचे उपाध्यक्ष अरुण नारायण यांचे प्रतिपादन
world heart day kem hospital success in saving 189 patients life under stemi project
जागतिक हृदय दिन : केईएम रुग्णालयात स्टेमी प्रकल्पांतर्गत १८९ रुग्णांचे प्राण वाचविण्यात यश
in chhattisgarh 8 people died including six student
परीक्षा देऊन घरी परतत असताना काळाचा घाला, अंगावर वीज कोसळल्याने सहा विद्यार्थ्यांचा मृत्यू; छत्तीसगडमधील घटना
Balasaheb Thackeray aapla dawakhana, aapla dawakhana,
‘बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्यात’ ७५ लाखांहून अधिक रुग्णांवर उपचार! आणखी नवीन ३७ दवाखाने सुरू करणार…
Student died Borivali , dumper, mumbai,
बोरिवलीमध्ये डंपरच्या धडकेत विद्यार्थ्याचा मृत्यू
Administrative Officer of Sassoon Hospital along with 16 employees embezzled Rs 4 Crore 18 Lakhs Pune news
‘ससून’चा पैसा सगळे मिळून खाऊ! रुग्णालयातील ४ कोटी रुपयांना असे फुटले पाय…

अशा रुग्णांना वेळीच उपचार मिळणे आवश्यक असते. वेळेत उपचार मिळाल्यास रुग्णाचा मृत्यू टाळता येतो. या पार्श्वभूमीवर आपत्कालीन वैद्यकीय सेवेतील सुधारणेबाबत पुण्यातील डॉक्टरांची नुकतीच एक बैठक झाली. ज्युपिटर हॉस्पिटलमधील डॉ. रवी प्रताप यांनी बैठकीचे सूत्रसंचालन केले. या वेळी भारती विद्यापीठातील डॉ. श्वेता त्यागी, महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवेचे डॉ. ज्ञानेश्वर शेळके, दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील डॉ. प्रसाद राजहंस यांच्यासह केईएम रुग्णालय, डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज हॉस्पिटल यांच्या आपत्कालीन वैद्यकीय सेवा विभागाचे प्रमुख उपस्थित होते.

हेही वाचा >>> पुणे : अवयवदानामुळे दोघांना जीवदान! महिनाभरात दोन यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी

पाश्चिमात्य देशांमध्ये पाच दशकांहून अधिक काळ आपत्कालीन वैद्यकीय सेवा विभाग आहे. भारतात मात्र २००९ पासून त्याची सुरुवात झाली. देशात या सेवेची गरज दिवसेंदिवस वाढत आहे. बैठकीत आपत्कालीन वैद्यकीय सेवेतील, तसेच इतर आव्हानांवर चर्चा करण्यात आली. या आव्हानांवर मात करण्यासाठी उपाययोजनाही सुचविण्यात आल्या. सध्याच्या आपत्कालीन वैद्यकीय सेवेत नवीन गोष्टींचा अंतर्भाव करण्यावरही चर्चा झाली.

आपत्कालीन वैद्यकीय सेवा दिन जगभर साजरा केला जातो. या सेवेमुळे रुग्णांना अतिशय गंभीर स्थितीत वेळीच उपचार मिळण्यास मदत होते. प्रत्येक रुग्णाला वेळेत आणि योग्य उपचार मिळावेत, हा आमचा उद्देश आहे. – डॉ. राजेंद्र पाटणकर, मुख्य कार्यकारी अधिकारी, ज्युपिटर हॉस्पिटल