पुणे : दिवाळीनिमित्त पुण्यातून मूळ गावी जाणाऱ्या विद्यार्थी आणि नागरिकांची संख्या मोठी असते. यामुळे या काळात सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसह खाजगी वाहतुकीला मोठी गर्दी असते. याच गर्दीचा फायदा घेऊन खाजगी प्रवासी बसमालकांनी प्रवाशांची लूट सुरू केली आहे. बसमालकांनी दिवाळीच्या काळासाठी दुप्पट भाडे आकारण्यास सुरुवात केली आहे. मात्र, याप्रकरणी खासगी बसच्या संघटनेने प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे (आरटीओ) बोट दाखविले आहे.

पुण्याहून दररोज सुमारे पाचशेहून अधिक खाजगी बस महाराष्ट्राच्या विविध भागांत जातात. या व्यतिरिक्त मुंबईहून येणाऱ्या पाचशे खाजगी बस पुण्यातून पुढे मार्गस्थ होतात. पुण्यातून जाणाऱ्या प्रवाशांमध्ये विदर्भ आणि मराठवाड्यातील प्रवाशांची संख्या अधिक असते. दिवाळीच्या काळात गावी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या खूप मोठी असते. प्रवाशांची संख्या वाढण्याच्या काळात बसचे भाडे वाढविण्याचे प्रकार केले जातात. दिवाळीच्या तोंडावर आता खासगी बसचालकांनी भाडे दुपटीहून अधिक वाढविले आहे. यामुळे प्रवाशांना मोठा भुर्दंड बसत आहे.

nashik vidhan sabha
नाशिक परिक्षेत्रात २५ दिवसांत ५० कोटींचा मुद्देमाल जप्त, १७ हजार गुन्हेगारांविरुध्द कारवाई
BJP Devendra Fadnavis Assets Net Worth Updates in Marathi
Devendra Fadnavis Income : उपमुख्यमंत्र्यांची एकूण संपत्ती किती?…
ageing population increasing in india
वृध्दांच्या लोकसंख्येचा दर वाढता, काय आहेत आव्हानं?
Chief Minister of Telangana, Himachal and Deputy Chief Minister of Karnataka reply to BJP on the scheme Print politics
गरिबांचे पैसे गरिबांना ही काँग्रेसची हमी; तेलंगणा, हिमाचलचे मुख्यमंत्री तर कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांचे भाजपला प्रत्युत्तर
mallikarjun kharge criticize pm narendra modi in nagpur
पंतप्रधान देशाचे असतात, पण मोदी मात्र सर्व चांगले प्रकल्प आपल्याच गृहराज्यात…खरगेंची जोरदार टीका
thane district home voting
ठाणे जिल्ह्यात ९३३ नागरिक करणार गृह मतदान, आज पासून मतदानास सुरुवात
vip roads for ordinary pune residents
लोकजागर : सामान्य पुणेकरांना ‘व्हीआयपी’ रस्ते मिळतील का?
Assembly Elections 2024 Akkalkuwa-Akrani Assembly Constituency Congress
लक्षवेधी लढत: अक्कलकुवा: लोकसभेतील पराभवाचे उट्टे काढणार का?

हेही वाचा – पुणे: व्यावसायिकाकडे दरमहा दहा हजार रुपये खंडणीची मागणी; तीन तरुण गजाआड

खाजगी प्रवासी बसला एसटी बसच्या प्रतिकिलोमीटर भाडेदराच्या दीडपट भाडे आकारता येते. याबाबतचे कमाल भाडेदर सरकारने २७ एप्रिल २०१८ रोजी निश्चित केले आहेत. काही खाजगी प्रवासी बस सणासुदीच्या व गर्दीच्या हंगामामध्ये प्रवाशांकडून मनमानी भाडे आकारत असल्याच्या तक्रारी येत आहेत. मात्र, जास्त भाडे आकारणाऱ्या खासगी बसवर आरटीओ आणि वाहतूक पोलिसांकडून कोणतीही कारवाई होताना दिसत नाही.

याप्रकरणी पुणे डिस्ट्रिक्ट लक्झरी बस असोसिएशनने १७ ऑक्टोबरला प्रादेशिक परिवहन कार्यालयाला पत्र पाठविले होते. या पत्रावर आरटीओकडून संघटनेला अद्याप प्रतिसाद मिळालेला नाही. पत्रात म्हटले आहे, की खाजगी बसचे दर आरटीओने निश्चित करून द्यावेत. आम्ही नियमानुसार एसटीच्या तिकिटाच्या दीडपट भाडे आकारत आहोत. हे दीडपट दर केवळ दिवाळीच्या आठ दिवसांच्या कालावधीत असतात. आरटीओने आम्हाला दर निश्चित करून दिल्यास त्याचे पालन आमच्याकडून केले जाईल. नियमाचे उल्लंघन करणाऱ्या बसमालकांवर आरटीओने कारवाई करावी.

हेही वाचा – फेरीवाल्यांच्या त्रासातून पिंपरी-चिंचवडकरांची होणार सुटका, महापालिकेने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

दिवाळीच्या काळातील किमान भाडे

प्रवास – एसटीचा दर – खाजगी बसचा दर

पुणे – नागपूर – १,६१५ – ३,०००

पुणे – छत्रपती संभाजीनगर – ३५९ – १,५००

पुणे – लातूर – ४९५ – १,२००

पुणे – रत्नागिरी – ४७९ – १,०००

पुणे – कोल्हापूर – ३४९ – ७६२

नियमापेक्षा जास्त भाडे आकारणाऱ्या खाजगी बसची तपासणी करण्यासाठी पथके नेमण्यात आली आहेत. भाडेवाढ करणाऱ्या बसमालकांवर तत्काळ कारवाई करण्यात येईल. याबाबत खाजगी बसच्या संघटनांसोबत सोमवारी बैठक घेतली जाणार आहे. – संजीव भोर, प्रभारी प्रादेशिक परिवहन अधिकारी

आम्ही दहा दिवसांपूर्वीच आरटीओकडे खाजगी बसचे दरपत्रक निश्चित करण्याची मागणी केली आहे. आम्हाला ते दरपत्रक अद्याप मिळालेले नाही. निश्चित केलेल्या भाड्यापेक्षा जास्त दर आकारल्यास संबंधित बसमालकाला संघटनेतून बाहेर काढण्यात येईल. – बाळासाहेब खेडेकर, अध्यक्ष, पुणे डिस्ट्रिक्ट लक्झरी बस असोसिएशन