अवकाशातील इलेक्ट्रॉन घनतेचा अभ्यास केल्यावर आंतरतारकीय हवामानाचा वेध घेता येतो. त्यासाठीचा विदा भारतीय पल्सार टायमिंग ॲरेतर्फे द ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटी ऑफ ऑस्ट्रेलियाच्या संशोधनपत्रिकेत प्रसिद्ध करण्यात आला असून, पुण्याजवळील खोडद येथील जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप दुर्बिणीतून (जीएमआरटी) घेतलेल्या साडेतीन वर्षांच्या निरीक्षणांचा त्यात समावेश आहे.

हेही वाचा >>>पुणे:‘नदीकाठ’ योजनेसाठी पुन्हा पर्यावरणीय मंजुरी प्रक्रिया?

maharashtra assembly election 2024 amol kolhe allegations bjp for online cash payment to voters
भोसरीत भाजपकडून ‘ऑनलाइन लक्ष्मी दर्शन’?, कोणी केला हा गंभीर आरोप
13 ex corporators left bjp in the pimpri chinchwad
पिंपरीत भाजपपुढे नाराजांची डोकेदुखी; आतापर्यंत १३ माजी नगरसेवकांचे…
maharashtra assembly election 2024 mla mahesh landge warns opposition
पिंपरी- चिंचवड: लांडगे संतापले; “कार्यकर्त्यांला त्रास दिल्यास वीस तारखेनंतर चा महेश लांडगे डोळ्यासमोर ठेवा”; शांततेचा अंत…
New Spider Species Baner Hill, Baner Hill,
कोळ्याच्या नवीन प्रजातीचा बाणेर टेकडी येथे शोध, काय आहे वेगळेपण?
Adulterated food pune, Food and Drug Administration pune, Diwali, Adulterated food,
भेसळयुक्त खाद्यपदार्थांचा लाखोंचा बाजार! पुणे विभागात दसरा, दिवाळीत अन्न व औषध प्रशासनाची कारवाई
Sunil Shelke, Ajit Pawar NCP, Maval candidate MLA Sunil Shelke,
अजितदादांच्या राष्ट्रवादीचे मावळचे उमेदवार आमदार सुनील शेळके यांच्यावर गुन्हा; ‘हे’ आहे कारण
Diwali
शहरबात : नेमेचि येते ‘आवाजा’ची दिवाळी!
A hoax bomb threat, Bharati Vidyapeeth medical college
भारती विद्यापीठ वैद्यकीय महाविद्यालयाला बाॅम्बने उडवून देण्याच्या धमकीचा ई-मेल
Pune Drunk drivers, proposal to suspend licenses,
पुणे : मद्यपी चालकांची ‘झिंग’ उतरणार, अडीच हजार जणांवर कारवाई; ५०० परवाने निलंबित करण्याचा प्रस्ताव

राष्ट्रीय रेडिओ खगोलभौतिकी केंद्राने (एनसीआरए) ही माहिती दिली. भारतीय पल्सार टायमिंग ॲरेमध्ये ४० पेक्षा जास्त भारतीय आणि जपानी शास्त्रज्ञांचा समावेश आहे. जीएमआरटीद्वारे विविध तरंगलांबीच्या रेडिओ लहरींचा अभ्यास करता येतो. त्यामुळे शास्त्रज्ञांना आंतरतारकीय इलेक्ट्रॉन घनतेतील बदलांचा अचूक अंदाज बांंधणे शक्य होते.

हेही वाचा >>>पुणे: काँग्रेसचा उद्यापासून सेवा, त्याग, कर्तव्य सप्ताह

अतिसूक्ष्म तरंगलांबीच्या गुरुत्वीय लहरींचा अभ्यास शास्त्रज्ञ करत आहेत. आतापर्यंत नोंदवलेल्या गुरूत्वीय लहरी न्यूट्रॉन तारे किंवा कृष्णविवरांच्या विलीनीकरणाच्या शेवटच्या टप्प्यातून उत्सर्जित होतात. या लहरींची वारंवारिता सेकंदाला काही शेकड्यापर्यंत असते आणि त्या सेकंदाच्या काही हजाराव्या भागापर्यंतच टिकतात. तर काही कृष्णविवरे सूर्याच्या वस्तुमानाच्या काही दशलक्ष किंवा काही अब्ज पटींपर्यंत जड असू शकतात. अशा अति महाकाय कृष्णविवरांच्या जोड्यांमधून उत्सर्जित होणाऱ्या गुरुत्वीय लहरींची वारंवारिता पृथ्वीवरील किंवा अंतराळातील शोधक वेध घेऊ शकतील त्यापेक्षा सूक्ष्म असतात. अंतराळाच्या पार्श्वभूमीवर वावरणाऱ्या गुरुत्वीय लहरींचा वेध मिलिसेकंद पल्सार या अतिशय वृद्ध न्यूट्रॉन ताऱ्याकडून येणाऱ्या रेडिओ लहरींचा अभ्यास केला जातो. या रेडिओ लहरी पृथ्वीवर येण्याचा वेळांमध्ये अतिशय सूक्ष्म विलंब होतात. हे विलंब अचूकपणे मोजून गुरुत्वीय लहरींचा वेध घेतला जातो. लहरींच्या वेळांमधून पूर्वकल्पना असलेले विलंब वजा केल्यावर उरलेल्या विलंबावर नॅनो-हर्ट्झ गुरुत्वीय लहरींचा ठसा असतो. आंतरतारकीय माध्यमात रेडिओ लहरी थोड्या प्रमाणात अस्ताव्यस्त होतात. या परिणामाचा परिपूर्ण अंदाज करणे अवघड असते. शक्य तितक्या अचूक पद्धतीने निरीक्षणे नोंदविणे हा एकच मार्ग त्यासाठी उपलब्ध असल्याचे शास्त्रज्ञांनी नमूद केले.

हेही वाचा >>>पुणे: आखाती देशात गेलेल्या घरेलू कामगारांच्या सुटकेसाठी ‘आप’चे प्रयत्न

विदाचे एकत्रिकरण…
जगभरातील पल्सार टायमिंग ॲरेचा विदा एकत्रित करण्याचे काम सध्या सुरू आहे. या विदाचा उपयोग संशोधनासाठी करता येणार आहे. या विदाच्या आधारे गुरुत्वीय लहरींचा शोध लवकरच लागण्याची शास्त्रज्ञांना अपेक्षा आहे.