पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) आणि महामेट्रो यांच्याकडून दोन समान मार्गांवर मेट्रो उभारणीचे प्रकल्प विकास आराखडे सादर करण्यात आले आहेत. त्यामुळे एकच संस्था या मार्गांचे काम करेल हे निश्चित करण्यात आले. आता हे मार्ग फायदेशीर ठरतील की नाही, हे तपासण्यासाठी पीएमआरडीएने सल्लागार नेमण्याचे पाऊल उचलले आहे. सल्लागारांचा अहवाल आल्यानंतर या मार्गांवर मेट्रो उभारणी कोण करणार, याचा निर्णय घेतला जाणार आहे.

पीएमआरडीएचे शिवाजीनगर ते लोणीकाळभोर आणि स्वारगेट ते सासवड या मार्गांचे प्रस्ताव आहेत. पीएमआरडीएने या मार्गांचा प्रकल्प विकास आराखडा दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडून तयार करून घेतला होता. याचवेळी महामेट्रोचा खडकवासला ते खराडी हा मार्ग प्रस्तावित आहे. त्यात खडकवासला ते स्वारगेट, स्वारगेट ते हडपसर, हडपसर ते खराडी आणि हडपसर ते लोणी काळभोर या टप्प्यांचा समावेश आहे. महामेट्रोने या मार्गाचा प्रकल्प विकास आराखडा खासगी सल्लागार संस्थेकडून तयार करून घेतला होता. दोन्ही संस्थांनी महापालिकेकडे हे प्रकल्प विकास आराखडे सादर केले होते. पीएमआरडीए आणि महामेट्रोचे प्रस्तावित मेट्रो मार्ग स्वारगेट-पूलगेट-हडपसरपर्यंत समान आहेत. पुढे दोन्ही मार्ग लोणी काळभोरपर्यंत जात आहेत. त्यामुळे जवळपास समान मार्गांवर दोन्ही संस्थांनी आराखडे तयार केले आहेत.

Municipal employees sealing a property in Kalyan East
कल्याण पूर्वेत थकबाकीदारांच्या मालमत्तांना टाळे
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
water pipe bursts in Dombivli
डोंबिवलीत काँक्रीट रस्ते काम करताना जलवाहिनी फुटली;  पी. पी. चेंबर्सजवळ शेकडो लीटर पाणी वाया
mmrda acquire farmers lands in 124 villages of uran panvel and pen for third mumbai
भूसंपादनाविरोधात शेतकऱ्यांची एकजूट; उरण, पनवेलमधील १२४ गावे संपादित करण्याची अधिसूचना
process of regularizing project affected constructions gained momentum after return of mahayuti government
गरजेपोटी बांधकामांच्या नियमितीकरण प्रक्रियेला वेग; तांत्रिक मूल्यमापनाचे काम अंतिम टप्प्यात
land acquisition for ring road
रिंग रोडसाठी २०० हेक्टर भूसंपादन बाकी; ५०० कोटींच्या निधीची रस्ते विकास महामंडळाकडे मागणी
Pune, sewage channels covering Pune, Pune Municipal Corporation, sewage pune, pune latest news,
पुणे : सांडपाणी वाहिन्यांची झाकणे समपातळीवर आणण्यासाठी महापालिकेने उचलले पाऊल !
leakage from main water pipeline schedule for water supply disrupts in bandra
मुख्य जलवाहिनीतून गळती; वांद्रे परिसरातील पाणीपुरवठ्यासाठी विशेष वेळापत्रक

आणखी वाचा-गणेशोत्सवात मोकाट जनावरांचा अडथळा; मालकांवर दंडात्मक कारवाईचा महापालिकेचा निर्णय

पुणे एकीकृत महानगर परिवहन प्राधिकरणाच्या (पुमटा) बैठकीत विभागीय आयुक्तांनी एकत्र येत असलेल्या मार्गांवर एकाच संस्थेने काम करावे, असे निर्देश दिले होते. हा प्रकल्प सार्वजनिक खासगी भागीदारीतून (पीपीपी) करण्यासाठी सल्लागार नेमण्याची सूचना त्यांनी पीएमआरडीएला केली होती. त्यानुसार, या मार्गाची आर्थिक व्यवहार्यता तपासण्यासाठी सल्लागार नेमण्याची पावले पीएमआरडीएने उचलली आहेत. यात त्या मेट्रो मार्गांच्या उत्पन्नासोबत इतर माध्यमातून मिळू शकणारा महसूलही पाहिला जाणार आहे.

महामेट्रो आणि पीएमआरडीए यांच्याकडून दोन समान मेट्रो मार्गांचे प्रकल्प विकास आराखडे तयार करण्यात आले होते. पुमटाच्या बैठकीत एकच संस्था हे काम करेल, हे निश्चित करण्यात आले. आर्थिक व्यवहार्यता तपासून पीएमआरडीए हे काम करण्याचा निर्णय घेईल. त्यांनी हे काम न केल्यास महामेट्रो ते करेल. -अतुल गाडगीळ, संचालक (कार्य), महामेट्रो

आणखी वाचा-यंदा पुणे महापालिकेचे अंदाजपत्रक डिसेंबरमध्ये?

महामेट्रोने स्वारगेट ते पूलगेटपर्यंत मेट्रो मार्गाचे काम करावे आणि रामवाडीपासून पुढे मगरपट्ट्यापर्यंत मेट्रो मार्गाचा विस्तार करावा, असा प्रस्ताव आहे. तिथून पुढे पीएमआरडीएला लोणी काळभोर आणि सासवडपर्यंत मेट्रो मार्गांचे काम करता येऊ शकते. सल्लागार नेमून या मार्गांची आर्थिक व्यवहार्यता तपासण्यात येणार आहे. त्यानंतरच अंतिम निर्णय घेतला जाईल. -रिनाज पठाण, अधीक्षक अभियंता, पीएमआरडीए

Story img Loader