लोकसत्ता प्रतिनिधी

पिंपरी : पीएच.डी पदवीसाठी सादर केलेला प्रबंध नाकारून सुधारणा करत पुन्हा सादर करणे आणि त्याला मान्यता देण्यासाठी वीस हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या मार्गदर्शक प्राध्यापिकेला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ पकडले. प्राध्यापिकेला ताब्यात घेतले असून ही कारवाई सांगवीतील बाबुरावजी घोलप महाविद्यालयात शनिवारी करण्यात आली.

important news regarding faculty recruitment What is the new policy
प्राध्यापक भरतीसंदर्भात मोठी बातमी! प्राध्यापकांच्या भरतीसाठी आलेले नवीन धोरण काय माहिती आहे काय?
ankita walawalkar aka kokan hearted girl first told to raj thackeray about her marriage
“लग्नाची बातमी सर्वात आधी राज ठाकरेंना…”, प्रेमाची जाहीर…
students allowed to fill out scholarship applications offline
शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांना ऑफलाइन अर्ज भरण्याची मुभा… काय आहे निर्णय?
Nagpur High Court , academic loss, student,
विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी न्यायालयाने नियमांपलिकडे…
tirupati laddu quality improved devotees appreciate says cm chandrababu naidu zws
तिरुपती लाडूच्या गुणवत्तेत सुधारणा! भाविकांकडून प्रशंसा : मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचा दावा
Devendra Fadnavis supports Nerul proposal to provide stipends for new lawyers
वकिलांना लवकरच विद्यावेतन मिळणार,उपमुख्यमंत्री फडणवीस
Student Support Committee Pune  organization working for needy students
स्कॉलरशिप फेलोशिप: ‘विद्यार्थी साहाय्यक समिती, पुणे’; गरजू विद्यार्थ्यांचा पुण्यातला हक्काचा आधारवड
Non-Creamy Layer, income proof OBC, OBC,
ओबीसींसाठी उत्पन्नाच्या दाखल्याची अट रद्द, शासन निर्णय काय सांगतो?

डॉ. शकुंतला निवृत्ती माने (वय ५९) असे लाच स्वीकारणाऱ्या मार्गदर्शक प्राध्यापिकेचे नाव आहे. याबाबत एका ४० वर्षीय पीएचडी करणाऱ्या प्राध्यापकाने ‘एसीबी’कडे तक्रार केली होती. तर, डॉ. माने या सांगवीतील बाबुरावजी घोलप महाविद्यालयात अर्थशास्त्र विभागाच्या प्रमुख आहेत. तक्रारदार हे प्राध्यापक असून त्यांनी अर्थशास्त्रामध्ये पीएच.डी पदवी प्राप्त करून घेण्यासाठी ऑनलाइन प्रबंध सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकरिता तयार केला आहे.

आणखी वाचा-पिंपरी : पवना नदी प्रदूषित करणाऱ्या चौघांवर गुन्हा

हा प्रबंध सादर करण्यासाठी मार्गदर्शक म्हणून डॉ. माने यांची विद्यापीठाकडून नियुक्ती झालेली आहे. तक्रारदाराने सादर केलेला प्रबंध नाकारण्यासाठी व सुधारणा करून पुन्हा सादर करणे आणि मान्यता देण्यासाठी डॉ. माने यांनी पंचवीस हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. याबाबत ‘एसीबी’कडे तक्रार केली होती. त्यानुसार ‘एसीबी’ने सापळा रचला. तक्रारीची पंचासमक्ष पडताळणी केली असता डॉ. माने यांनी तक्रारदाराकडे पंचवीस हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचे स्पष्ट झाले. त्यापैकी वीस हजार रुपयांचा पहिला हप्ता पंचासमक्ष स्वीकारताना डॉ. माने यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.