पुणे : हिंदू देवतांबद्दल सिम्बॉयसिस कॉलेजमधील प्राध्यापक अशोक ढोले यांनी वादग्रस्त विधान केल्याचा व्हिडीओ काल सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्या घटनेची कॉलेज प्रशासनाने गंभीर दखल घेत अशोक ढोले यांना निलंबित केले आहे. अशी माहिती सिम्बॉयसिस कॉलेजचे प्राचार्य हृषिकेश सोमण यांनी दिली.
हिंदू देवतांबद्दल सिम्बॉयसिस कॉलेजमधील प्राध्यापक अशोक ढोले यांनी वादग्रस्त विधान केल्याचा व्हिडीओ काल सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर पुणे शहरातील विविध हिंदुत्ववादी संघटनांनी प्राध्यापक अशोक ढोले यांच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी डेक्कन पोलिसांकडे केली. त्यानुसार याप्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू असताना अभविपकडून आज दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास सिम्बॉयसिस कॉलेजच्या प्रवेशद्वारावर आंदोलन करण्यात आले.
आणखी वाचा-भरधाव कंटेनरने दिलेल्या धडकेत सायकलवरून जाणार्या ११ वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू
त्यावेळी प्राचार्य हृषिकेश सोमण म्हणाले की, सिम्बॉयसिस कॉलेजमधील प्राध्यापक अशोक ढोले यांनी जे वादग्रस्त विधान केले आहे. त्या गोष्टीचं आम्ही कोणी ही समर्थन करित नाही. त्या पार्श्वभूमीवर आम्ही अशोक ढोले यांना निलंबित केले आहे आणि त्या प्रकरणी चौकशी समिती नेमण्यात आली आहे. त्यानुसार पुढील कारवाई केली जाणार असल्याची भूमिका त्यांनी मांडली.