पुणे : कसबा विधानसभा मतदारसंघाचा पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून, मंगळवारपासून (३१ जानेवारी) आचारसंहिता लागू झाली आहे. आदेशाचा भंग करणाऱ्यांविरुद्ध कारवाईचे आदेश सहपोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दिले आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
कसबा विधानसभा मतदारसंघातील आमदार मुक्ता टिळक यांचे निधन झाले. त्यानंतर पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली. पोटनिवडणुकीत २६ फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून, २ मार्च रोजी मतमोजणी होणार आहे. कसबा विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी पोलिसांनी बंदोबस्ताची आखणी केली आहे. कसबा विधानसभा मतदारसंघातील समर्थ, फरासखाना, विश्रामबाग, खडक, दत्तवाडी या पोलीस ठाण्याच्या हद्दीत कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी बेकायदा शस्त्र बाळगणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश सहपोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दिले आहेत.
पोलीस दल, संरक्षण दल, कारागृह विभाग, बँक सुरक्षा विभाग, अन्य केंद्रीय, शासकीय कर्मचाऱ्यांना या आदेशातून सूट देण्यात आली आहे. शस्त्र बाळगण्याचा परवाना असलेल्यांना या आदेशातून सूट देण्यात आली आहे. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश सहपोलीस आयुक्त कर्णिक यांनी दिले.
हेही वाचा – एमपीएससी परीक्षार्थींचे उद्या पुण्यात ‘अराजकीय साष्टांग दंडवत’ आंदोलन
सभेसाठी परवानगी बंधनकारक
सार्वजनिक रस्ता, ठिकाणी सभा घेण्यास पोलिसांची परवानगी घेणे बंधनकारक आहे. ध्वनीक्षेपकाचा वापर रात्री दहा ते सकाळी सहा या कालावधीत करण्यास मनाई करण्यात आली आहे. फिरत्या वाहनावरून ध्वनीक्षेपकाचा वापर करण्यास मनाई करण्यात आली आहे. ध्वनीक्षेपक वापराचा परवाना बाळगणे गरजेचे आहे. वाहन थांबवून ध्वनीक्षेपकाचा वापर करावा, तसेच आवाजाबाबत दिलेल्या मर्यादेचे काटेकोरपणे पालन करावे. शाळा, महाविद्यालय, रुग्णालयांच्या परिसरात ध्वनीक्षेपकाचा वापर करू नये. प्रचार फेरी, मिरवणूक मार्गाची माहिती स्थानिक पोलीस ठाण्यांना देणे गरजेचे आहे.