रेकोल्ड थर्मो आणि ग्रीन एनर्जी फाउंडेशनतर्फे ऊर्जा संवर्धनाच्या जनजागृतीसाठी ‘स्वीच टू ग्रीन’ हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमामध्ये सुमारे १५ सोसायटय़ांमधील ३०० सभासद सहभागी झाले होते. उपक्र मामधून मिळालेल्या माहितीच्या आधारे सोसायटय़ांमध्ये ऊर्जा संवर्धनासाठी एकत्रित प्रयत्न केले जात आहेत.
‘स्वीच टू ग्रीन’ या उपक्रमामध्ये सोसायटीतील सदस्यांना वैयक्तिक आणि सामाजिक पातळीवर ऊर्जा संवर्धन कसे करता येईल याचे प्रशिक्षण देण्यात आले. कोथरूडमधील सदिच्छा को ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटीमध्ये ऊर्जा बचतीसाठी वाहनतळ, जिने यांसारख्या ठिकाणी बसवलेल्या टय़ूबलाइट्स काढून त्या ठिकाणी सीएफएल लॅम्प बसवण्यात आले आहेत. तसेच पाण्याचा पंप दहा ते बारा तास चालू असायचा, तो आता केवळ दोन ते अडीच तास चालू असतो, अशी माहिती सोसायटीचे खजिनदार गजानन दीक्षित यांनी दिली. इतर सोसायटय़ांमध्येही ऊर्जा बचतीसाठी वेगवेगळे उपाय केले जात आहेत. काही सोसायटय़ांमध्ये सौरऊर्जेवर चालणारे दिवे वापरण्याचा ठराव वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये मंजूर केला जाणार आहे. जीएसएल बल्बच्या जागी एलइडी बल्ब बसवणे, दिवे, लिफ्ट, पाण्याचा पंप काटकसरीने वापरून वर्षभरात किमान दहा हजार युनिट वीज कमी वापरणे यांसारखे मार्ग अवलंबण्यात येत आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा