पुणे : चार वर्षांपूर्वी महापालिकेच्या मिळकतकर अभय योजनेचा फायदा घेतलेल्यांपैकी निम्मे मालमत्ताधारक पुन्हा थकबाकीदार असल्याची माहिती समोर आली आहे. या थकबाकीदारांकडून तातडीने मिळकतकराची रकम वसूल करून त्यांना पुन्हा अभय योजनेचा फायदा दिला जाऊ नये, अशी मागणी केली जात आहे.

मिळकतकराची कोट्यवधी रुपयांची थकबाकी वसूल व्हावी, यासाठी चार वर्षांपूर्वी (२०२०-२१) मध्ये महापालिकेने अभय योजना आणली होती, या योजनेचा फायदा घेऊन एक लाख ४९ हजार ६८३ थकबाकीदारांनी महापालिकेचा कर भरला. या योजनेमुळे महापालिकेने थकबाकीदारांना केलेला दंड आणि व्याजमाफी पोटी महापालिकेचे २१० कोटी रुपयांचे नुकसान झाले. त्यानंतर दुसऱ्या वर्षी २०२१-२२ मध्ये महापालिकेने पुन्हा अभय योजना आणली होती. या योजनेचा फायदा ६६ हजार ४५४ थकबाकीदार मिळकतकरधारकांनी घेऊन थकबाकी भरली. या प्रक्रियेतही महापालिकेचे ६४ कोटी रुपयांचे नुकसान झाले.

Accident
Accident : बोगद्यात अपघात, BMW चा चक्काचूर, मदतीसाठी अर्धा तास याचना, पण…; भयंकर अपघातातून वाचलेल्या महिलेचा थरारक अनुभव
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
Ajit Pawar On Mahayuti Politics
Ajit Pawar : राज्याला तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार? संजय राऊतांच्या दाव्यावर अजित पवारांचं चार शब्दांत उत्तर; म्हणाले…
Vasai Virar Municipal Solid Waste Management Project marathi news
‘पैसे नाहीत, असे कसे म्हणता?’, महाराष्ट्र सरकारला सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
vidya balan
“ही मुलगी पनवती…”, विद्या बालनने सांगितली ‘ती’ आठवण; म्हणाली, “एका मल्याळम चित्रपटात…”
senior citizen dies in st bus accident
एसटी बसच्या धडकेत ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू
Raj Thackeray
Raj Thackeray : “सत्ता हातात द्या पहिल्या ४८ तासांत मशिदीवरचे भोंगे काढतो”, राज ठाकरेंचं वरळीतील सभेत विधान
Pune Municipal Corporation has decided to make it mandatory for tanker drivers to obtain license
पाणी नक्की कुठून घेतले, कुठे दिले हे सांगावे लागणार!

या योजनांमुळे दरवर्षी प्रामाणिकपणे वेळेवर कर भरणाऱ्या नागरिकांवर याचा परिणाम होईल. तसेच, यामुळे थकबाकीदार नवीन अभय योजना येईपर्यंत नियमित कर भरणार नाहीत, अशी भीती व्यक्त केली जात होती. ही भीती खरी ठरली असून, ज्या मिळकतदार थकबाकीदारांनी चार वर्षांपूर्वी महापालिकेच्या अभय योजनेचा फायदा घेतला होता. त्यातील निम्मे पुन्हा थकबाकीदार झाले आहेत. सजग नागरिक मंचाचे विवेक वेलणकर यांनी माहितीच्या अधिकारात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना महापालिकेने ही माहिती दिली आहे.

चार वर्षांपूर्वी २०२०-२१ मध्ये एक लाख ४९ हजार ६८३ थकबाकीदार मालमत्ता धारकांनी अभय योजनेचा फायदा घेतला. त्यापैकी ६३ हजार ५१८ मालमत्ताधारक डिसेंबर २०२४ अखेर पुन्हा थकबाकीदार झाले. तर, २०२१-२२ मध्ये ज्या ६६ हजार ४५४ थकबाकीदार मालमत्ताधारकांनी अभय योजनेचा फायदा घेतला, त्यापैकी ४४ हजार ६८५ मालमत्ताधारक डिसेंबर २०२४ अखेर पुन्हा थकबाकीदार झाले आहेत. अभय योजनेचा फायदा घेतल्यानंतरही लाखापेक्षा अधिक मालमत्ताधारकांनी महापालिकेचा मिळकतकर थकविला आहे. त्यांना यापुढील काळात कोणतीही सवलत न देता महापालिकेने त्यांच्याकडून तातडीने थकबाकीची वसूल करावी तसेच अभय योजनेचा फायदा देखील या थकबाकीदारांना होणार नाही, यासाठी महापालिकेने लक्ष द्यावे, अशी मागणी वेलणकर यांनी महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांच्याकडे केली आहे.

Story img Loader