पिंपरी: महापालिकेने पूर्वलक्षीप्रभावाने सुरू केलेल्या कचरा सेवा शुल्क वसुलीला राज्य शासनाने स्थगिती दिल्यानंतर कर संकलन विभागाने मालमत्ताकर देयकांच्या संगणक प्रणालीत बदल केला आहे. त्यामुळे मालमत्ताधारकांना कचरा सेवा शुल्क न भरता आपला मूळ कर भरता येणार आहे. मालमत्ताधारकांची कचरा सेवा शुल्कातून तात्पुरती सुटका झाली आहे.

राज्य शासनाच्या नगर विकास विभागाने कचरा सेवा शुल्क वसुलीला तात्पुरती स्थगिती दिली. त्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक होईपर्यंत शुल्क वसुली न करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर आरोग्य विभागाचे सहायक आयुक्त यशवंत डांगे यांनी शासन आदेशाची अंमलबजावणी करावी, अशा सूचना कर संकलन व कर आकारणी विभागाला दिल्या. त्यानंतर कर संकलन विभागाने संगणक प्रणालीत बदल केला. त्यानुसार २६ डिसेंबरपासून नागरिकांच्या ऑनलाइन देयकांमध्ये कचरा सेवा शुल्क स्थगिती आदेशाची अंमलबजावणी सुरू केली आहे. त्यामुळे मालमत्ताधारकांनी थकीत आणि चालू कर भरून महापालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन सहायक आयुक्त नीलेश देशमुख यांनी केले.

Deportation of 101 criminals within Maval Vidhan Sabha Constituency Police Station limits Pune news
मावळचे वातावरण तापले! तालुक्यातून १०१ गुन्हेगार हद्दपार
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Supreme Court orders MHADA to submit details of flats grabbed by developers Mumbai print news
विकासकांनी हडपलेल्या सदनिकांची माहिती असमाधानकारक ! पुन्हा माहिती सादर करण्याचे ‘म्हाडा’ला आदेश
mpcb issues notice to hinjewadi it park over functioning of common sewage treatment plan
हिंजवडी आयटी पार्कला जलप्रदूषणासाठी नोटीस; सामाईक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पावर प्रदूषण नियंत्रण मंडळाचा ठपका
Municipal corporation Thane, illegal hoarding holders Thane, illegal hoarding Thane,
ठाण्यात ५२ बेकायदा होर्डिंगधारकांना पालिकेच्या नोटीसा, १० कोटी ९६ लाखांचा दंड पालिका करणार वसूल
ATM money theft pune, thief caught pune,
पुणे : एटीएममधून रोकड चोरणाऱ्या चोरट्याला पकडले; सुरक्षारक्षक, वाहतूक पोलिसांची तत्परता
80 lakh cash worth rs 17 lakh mephedrone seized in pimpri chinchwad
पिंपरी-चिंचवडमध्ये ८० लाखांची रोकड, १७ लाखांचे मेफेड्रोन जप्त
issue in pimpri assembly constituency
गुन्हेगारी, अतिक्रमणे, अनारोग्य आणि प्रदूषण; वाचा कोणत्या मतदारसंघात आहेत ‘या’ समस्या

हेही वाचा… येरवडा कारागृहातच खून, कैद्याला कात्रीने भोसकले

राज्य शासनाच्या नगर विकास विभागाने दिलेल्या आदेशानुसार कचरा सेवा शुल्क वसूल करण्यास स्थगिती दिली आहे. त्यानुसार कर संकलन विभागाच्या संगणक प्रणालीत बदल केल्याचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी सांगितले.