शिक्षण किंवा नोकरीच्या निमित्ताने पुण्यात येणाऱ्यांची संख्या वाढत असताना सदनिका भाडय़ाने घेणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. ही बाब लक्षात घेऊन घर भाडय़ाने घेण्यादेण्यासाठी पोर्टलच्या साहाय्याने भाडेकरू व मालक यांच्यात मध्यस्थी करणाऱ्या संस्थांचा मुंबई व बंगळुरूपाठोपाठ पुण्यातही प्रवेश झाला असून, हळूहळू एकेक संस्था शहरात दाखल होत आहेत. ‘नो ब्रोकर’ या नव्या संस्थेने घर भाडय़ाने देण्याघेण्यासाठी बुधवारी त्याचे प्रॉपर्टी सेल पोर्टल जाहीर केले.
शहरातील शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षण घेण्यासाठी व प्रामुख्याने माहिती-तंत्रज्ञान विभागातील उद्योगांमध्ये काम करण्यासाठी देशातील विविध भागातून विद्यार्थी किंवा नोकरदार येत असतात. त्यातून घर भाडय़ाने घेणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. त्यामुळेच आधुनिक तंत्राचा वापर करून घर भाडय़ाने देण्याघेण्याच्या व्यवहारातही विविध संस्था उतरल्या आहेत. भाडय़ाने घर हवे असेल, तर ते शोधण्यासाठी अनेकांना दलालांचा आधार घ्यावा लागतो. दलाल मंडळींकडून त्यासाठी मोठे शुल्कही घेतले जाते.
भाडेकरू व घरमालक यांच्यामधील दलाल दूर करण्याच्या उद्देशाने ‘नो ब्रोकर’ या संस्थेने हे पोर्टल सुरू केले आहे. त्याबाबतची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. noBroker.com या नावाने प्राॉपर्टी सर्च पोर्टल तयार करण्यात आले आहे. पोर्टलच्या माध्यमातून घररमालक व भाडेकरू यांचा एकमेकांशी संपर्क करून देण्यात येणार आहे. आपण घरमालक असल्यास आपल्या सदनिकेची नोंदणी ०८१०७५५५६६६ या क्रमांकावर मिस्ड कॉल करून किंवा व्हॉटस् अॅप संदेश पाठवून करता येणार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा