पुणे : नागरिकांनी मुंबई, पुणे, ठाणे, रायगड आणि नागपूर या पाच जिल्ह्यांमध्ये मालमत्ता खरेदी-विक्रीला प्राधान्य दिल्याचे समोर आले आहे. या पाच जिल्ह्यांत मालमत्ता खरेदी-विक्री व्यवहारांमधून ३० हजार ४८१ कोटी रुपयांचा मुद्रांक शुल्क महसूल प्राप्त झाला आहे. मालमत्ता खरेदी-विक्रीत मुंबई आघाडीवर असून, पुणे दुसऱ्या स्थानावर आहे.
नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षाचा आढावा घेतला. त्यामध्ये ही बाब समोर आली आहे. राज्यातील महानगरांमध्ये सुरू असलेली विकासकामे, विमानतळ, वर्तुळाकार रस्ते, मेट्रोचे जाळे, तसेच विविध महत्त्वाकांक्षी प्रकल्प, वाढते नागरीकरण, पंतप्रधान आवास योजनेंतर्गत उभारण्यात येणारी घरे, औद्योगिकीकरण, नवे महामार्ग अशा अनेक विकास प्रकल्पांमुळे जमिनीचे दर दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. नागरिकरणाचा वेग राज्यातील महानगरांमध्ये जास्त आहे.
हेही वाचा…‘वंचित’कडून मंगलदास बांदल यांची शिरुरची उमेदवारी रद्द
त्यामुळे या ठिकाणांहून मुद्रांक शुल्कातून जास्त महसूल गोळा झाल्याचे निरीक्षण नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने नोंदविले आहे. गेल्या आर्थिक वर्षात स्थावर मालमत्ता घेणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. वर्षभरात (३१ मार्चपर्यंत) तब्बल ५०,९५७ कोटी २८ लाख १८ हजार ६०३ रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे, अशी माहिती सहनोंदणी महानिरीक्षक नंदकुमार काटकर यांनी दिली.
राज्यभरातील सर्वाधिक महसूलप्राप्त जिल्हे
मुंबई – १०,६८६ कोटी ४६ लाख ३९ हजार ६३४,
पुणे – ९,९०४ कोटी ८५ लाख ७१ हजार ६८१,
ठाणे – ५,८०९ कोटी ३३ लाख ७३ हजार ६५१
रायगड – २,५११ कोटी ३४ लाख ४६ हजार १५६
नागपूर – १,५६९ कोटी ७० लाख ४५ हजार ४२४,
नाशिक – १,२२० कोटी ६७ लाख ९१ हजार ५४५
छत्रपती संभाजीनगर – ६१२ कोटी ९६ लाख ८१ हजार २११,