पुणे : विमाननगर भागात मसाज पार्लरमध्ये सुरू असलेला वेश्याव्यवसायाचा प्रकार गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने उघडकीस आणला. पोलिसांनी मसाज पार्लरवर छापा टाकून सहा तरुणींना ताब्यात घेतले. या प्रकरणी मसाज सेंटरच्या व्यवस्थापकासह चार जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी मसाज सेंटर व्यवस्थापक मणीकंठ राहुल नायडू (वय २०, रा. थेरगाव, पिंपरी-चिंचवड), विशाल अग्रवाल, नायडू बाई, नितिन माने यांच्या विरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. मणीकंठ नायडूला पोलिसांनी अटक केली असून पोलीस नाईक इम्रान नदाफ यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. विमाननगर भागात अमायरा स्पा नावाच्या मसाज पार्लरमध्ये मसाजच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली.

thief escapes police custody
पोलीस दरोडेखोराला घेऊन ‘स्पा’मध्ये गेले, ‘मसाज’चा आनंद लुटत असताना चोर झाला पसार
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
anti extortion squad by mira bhayandar police commissionerate
व्यावसायिकाना धमकवण्याचे प्रकार वाढले; खंडणी विरोधी पथकाची स्थापन
Prostitution under name of massage parlour in Kalyaninagar police arrest one
कल्याणीनगरमध्ये मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय, पोलिसांकडून एकास अटक
bhandup police arrested accused who forced women into prostitution by luring money
महिलांना वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडणारा आरोपी अटकेत
Over 150 young women sexually abused by perverted counsellor
नागपूर : विकृत समुपदेशकाकडून दीडशेवर तरुणींचे लैंगिक शोषण; पीडितांमध्ये वकील, अभियंता…
people , Vidarbha , Republic Day celebrations,
गणराज्य दिन संचलनाचे विदर्भातील ५१ जण होणार साक्षीदार
Sex racket in salon and massage parlour in Sadar
सदरमध्ये सलून अ‍ॅण्ड मसाज पार्लरमध्ये ‘सेक्स रॅकेट’

हेही वाचा >>>पुणे: दहावीची बनावट प्रमाणपत्रे देणारी टोळी गजाआड

त्यानंतर पोलिसांच्या पथकाने बनावट ग्राहकाच्या माध्यमातून खातरजमा केली. मसाज पार्लरवर छापा टाकून सहा तरुणींना ताब्यात घेतले. मसाज सेंटरमधून रोकड तसेच मोबाइल संच असा एक लाख २८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सामाजिक सुरक्षा विभागाचे पोलीस निरीक्षक भरत जाधव, सहायक निरीक्षक अश्विनी पाटील, बाबा कर्पे, अजय राणे, इम्रान नदाफ, इरफान पठाण, रेश्मा कंक, ओंकार कुंभार आदींनी ही कारवाई केली.

Story img Loader