गुन्हे शाखेचा छापा; दोघे अटकेत

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कोरेगाव पार्क भागातील एका उच्चभ्रू सोसायटीत मसाज पार्लरच्या नावाखाली सुरू असलेला वेश्या व्यवसाय गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने छापा टाकला. या कारवाईत आठ तरुणींना ताब्यात घेण्यात आले असून दोघांना अटक करण्यात आली.

या प्रकरणी किरण चंद्रकांत कोळी (वय २९, रा. नेहरुनगर, पिंपरी), महंमद इंजामुल हुसेन (वय १९, रा. कोरेगाव पार्क) यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी मुकुल घुले, अनुज कुमार, राकेश पांडे, अब्दुल बतेने, सोनबा निगडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक सत्यवान गेंड यांनी या संदर्भात कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

कोरेगाव पार्कमधील नॉर्थ मेन रस्त्यावर असलेल्या एका सोसायटीत ली ब्युटी स्पा मसाज सेंटर आहे. तेथे मसाजच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश पुराणिक यांना मिळाली. बनावट ग्राहकाच्या माध्यमातून खातरजमा करण्यात आली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने तेथे छापा टाकला. मसाज सेंटरमधील व्यवस्थापक कोळी आणि हुसेन यांना अटक करण्यात आली. या कारवाईत आठ तरुणींना ताब्यात घेण्यात आले. न्यायालयाच्या आदेशाने तरुणींना निरीक्षण गृहात ठेवण्यात आले आहे.

अतिरिक्त आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेश पुराणिक आणि पथकाने ही कारवाई केली.