पुणे : धानोरी परिसरातील महादेवनगर या ठिकाणी पैशांचे आमिष दाखवून मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय करणारे रॅकेट पोलिसांच्या छाप्यात उघडकीस आले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी वेश्याव्यवसायातून तीन महिलांची सुटका केल्याची माहिती बुधवारी दिली आहे. याप्रकरणी महिला पोलीस हवालदार मनीषा सुरेश पुकाळे यांनी आरोपींविरोधात विश्रांतवाडी पोलीस ठाणे येथे तक्रार दाखल केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> पुणे: लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार करणारा पोलीस कर्मचारी निलंबित

 याप्रकरणी रंजना सनातून सिंगदेवी (वय ३५, रा. धानोरी, पुणे, मूळ राहणार आसाम) या महिलेस अटक करण्यात आली आहे. तिचे साथीदार सुरेश शाहू आणि पूजा पवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धानोरी येथील महादेवनगर या ठिकाणी गुडविल स्क्वेअर येथील प्रीमियम युनिक सलूनमध्ये मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकास मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सदर माहितीबाबत खातरजमा करत, संबंधित पाच सेंटरवर छापा टाकून पीडित तीन महिलांची सुटका केली. संबंधित महिलांना पैशांचे आमिष दाखवून वेश्याव्यवसाय करण्यासाठी प्रवृत्त करून त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेऊन त्यातून मिळालेल्या रकमेतून स्वतःची उपजीविका करताना आरोपी मिळून आलेले आहेत. याबाबत विश्रांतवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक एस ढवळे पुढील तपास करत आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prostitution racket busted at massage center in dhanori area pune print news vvk 10 zws