पुणे : कोरेगाव पार्क भागातील एका सदनिकेत सुरू असलेल्या वेश्याव्यवसायाचा प्रकार पोलिसांनी उघडकीस आणला. पोलिसांनी छापा टाकून थायलंडमधील दोन तरुणींना ताब्यात घेतले. तरुणींना वेश्याव्यवसायास प्रवृत्त केल्याप्रकरणी थायलंडमधील एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

याबाबत पोलीस हवालदार रईसा बेग यांनी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिच्याविरुद्ध अनैतिक मानवी देहव्यापार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गु्न्हा दाखल करण्यात आलेली महिला मूळची थायलंडमधील आहे. तिने कोरेगाव पार्कमधील एका सोसायटीत सदनिका भाडेतत्त्वावर घेतली होती.

हेही वाचा…पिंपरी- चिंचवड : महानगरपालिका शाळेतील तिसऱ्या मजल्यावरून पडल्याने आठवीतील विद्यार्थ्याचा मृत्यू

थायलंडमधील दोन तरुणींना स्पामध्ये काम देण्याच्या आमिषाने तिने भारतात आणले होते. कोरेगाव पार्कमधील सदनिकेत थायलंडमधील दोन तरुणी वेश्याव्यवसाय करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. कोरेगाव पार्क पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सातपुते, गु्न्हे शाखेचे निरीक्षक मोरे यांच्या मार्गदर्शनखाली पथकाने सदनिकेत छापा टाकून दोन तरुणींना ताब्यात घेतले. तरुणींना वेश्याव्यवसायास प्रवृत्त करणाऱ्या महिलेविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prostitution ring busted in pune s koregaon park 2 young women from thailand detained pune print news rbk 25 psg