पुणे : मसाज सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाचा प्रकार गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने उघडकीस आणला. या कारवाईत चार तरुणींना ताब्यात घेण्यात आले. मसाज सेंटरचा व्यवस्थापकासह दोघांना अटक करण्यात आली.अमिर अबुसुबन हुसेन (वय २२), नवाज लालूमियाँ उदिल (वय २१) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत सामाजिक सुरक्षा विभागाचे पोलीस हवालदार अजय राणे यांनी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

कोरेगाव पार्क भागातील अवयान स्पा ज्वेल या मसाज सेंटरमध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली. त्यानंतर बनावट ग्राहकाच्या माध्यमातून खातरजमा करण्यात आली.वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार आणि पथकाने तेथे छापा टाकला. या कारवाईत चार तरुणींना ताब्यात घेण्यात आले. तरुणींना वेश्या व्यवसायास प्रवृत्त केल्या प्रकरणी हुसेन आणि उदिल यांना अटक करण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपाली भुजबळ तपास करत आहेत.

Story img Loader