लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : मसाज पार्लरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायाचा प्रकार गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाने उघडकीस आणला. सिंहगड रस्त्यावरील धायरी भागात एका मसाज पार्लरवर छापा टाकून पोलिसांनी पार्लरचालक महिलेला अटक केली.

Girl's Hair Cut case At Dadar Station
“म्हणून मी तिचे केस कापले…”, दादर स्थानकात तरुणीचे केस कापणाऱ्या आरोपीचा धक्कादायक खुलासा
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Image of the Supreme Court building
Ladki Bahin Yojana : “सरकारकडे ‘लाडकी बहीण’ सारख्या योजनांसाठी पैसे आहेत पण…”, मोफत पैसे देण्याच्या योजनांवर सर्वोच्च न्यायालयाचा संताप
dhananjay Munde
मुंडेंच्या राजीनाम्यासाठी भाजपचा दबाव; मित्रपक्षाच्या नेत्यांची आक्रमक भूमिका
Pedestrian bridge unused due to inconvenience Municipal Corporation neglects maintenance
‘पाऊल’ अडते कुठे? असुविधांमुळे पादचारी पूल वापराविना; देखभालीकडे महापालिकेचे दुर्लक्ष
homosexual, Akola , Marriage for money,
अकोला : पैशांसाठी लग्न, पोलीस पत्नीचा छळ अन् पती निघाला समलैंगिक….
torres ponzi scam in mumbai
Torres Ponzi Scam: ‘असा’ झाला टोरेस कंपनीचा घोटाळा; मालक विदेशात फरार, अनिश्चिततेत गुंतवणूकदार!
What Sarangi Mahajan Said?
Sarangi Mahajan : सारंगी महाजन यांचा आरोप; “धनंजय आणि पंकजा मुंडे या दोघांनी माझी जमीन लाटली, आणि..”

जोयश्री नरेन तामोली (वय ३२, रा. नांदेड फाटा, सिंहगड रस्ता, मूळ रा. बामुनगाव, जि. जोराहाट, आसाम) असे अटक करण्यात आलेल्या मसाजपार्लर चालक महिलेचे नाव आहे. याबाबत अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक शाखेतील सहायक पोलीस फौजदार छाया जाधव यांनी नांदेड सिटी (सिंहगड रस्ता) पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंहगड रस्त्यावरील धायरी भागात डे स्पा या मसाज पार्लरमध्ये वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने मंगळवारी सायंकाळी छापा टाकला. मसाज पार्लरमधून तरुणींना ताब्यात घेण्यात आले. तरुणींना पैशांचे आमिष दाखवून त्यांना वेश्याव्यवसायास प्रवृत्त केल्याप्रकरणी तामोली हिला अटक करण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक भोस तपास करत आहेत.

आणखी वाचा-‘पाऊल’ अडते कुठे? असुविधांमुळे पादचारी पूल वापराविना; देखभालीकडे महापालिकेचे दुर्लक्ष

शहरातील वेगवेगळ्या भागात मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय सुरू असल्याच्या तक्रारी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांंच्याकडे करण्यात आल्या होत्या. त्यानंतर पोलीस आयुक्तांनी मसाज पार्लरमध्ये सुरू असलेल्या गैरप्रकारांवर कारवाईचे आदेश दिले होते. गेल्या वर्षभरात मसाज पार्लरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसाय प्रकरणी ३३ गुन्हे दाखल करण्यात आले.

Story img Loader