पुणे : वानवडीतील फातिमानगर परिसरात मसाज पार्लरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी पाच तरुणींना ताब्यात घेतले असून एकास अटक केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वानवडीमधील फातिमानगर परिसरात क्लिओज स्पा अ‍ॅण्ड सलून येथे मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय करण्यात येत असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली. पोलिसांच्या पथकाने मसाज पार्लरवर छापा टाकला. मसाज पार्लरमधून पाच तरुणींना ताब्यात घेण्यात आले. तर मसाज सेंटरचा चालक श्रीधर मोहन साळुंखे (४२, रा. कसबा पेठ) याला अटक करण्यात आली आहे. तरुणींना वेश्या व्यवसायास प्रवृत्त केल्याप्रकरणी श्रीधर साळुंखे याच्याविरुद्ध वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा – पुणे: बांधकाम व्यावसायिकाची ५१ लाखांची फसवणूक

गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाचे पोलीस निरीक्षक भरत जाधव यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prostitution under the name of massage parlor in wanwadi crime branch raid pune print news rbk 25 ssb